आरोग्य केद्रांच्या समस्यांबाबत आरोग्यमंत्री टोपे यांना निवेदन

आरोग्य केद्रांच्या समस्यांबाबत आरोग्यमंत्री टोपे यांना निवेदन

हरसूल । वार्ताहर Harsul

शासकीय योजनांमधील (Government schemes) लाभार्थ्यांसह स्तनदा माता, गरोदर माता, विविध वयोगटातील बालक तसेच डिलिव्हरी व उपचार घेणार्‍या रुग्णाचा ग्रामीण भागातही आरोग्य केंद्र (health center), उपकेंद्राकडे ओढा दिसून येत आहे.

परंतु कधी काळी रुग्णवाहिकेविना (Ambulances) मुकण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याने हरसूल भागातील ठाणापाडा गटातील ठाणापाडा, चिंचओहळ, मूलवड, शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राना (Primary Health Center) नवीन रुग्णवाहिका मिळावी, आरोग्य केंद्रातील रिक्त पदे (Vacancies) तत्काळ भरावीत अशा मागणीचे निवेदन (memorendum) आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांना नाशिक (nashik) येथील भेटीप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या भारती भोये यांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar taluka) ठाणापाडा गटात चार प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. त्यापैकी काही आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकांची सोय नसल्याकारणामुळे गैरसोय होत आहे. त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या होणार्‍या गैरसोयीचा विचार करण्यात यावा, यासाठी नवीन रुग्णवाहिका देण्यात याव्यात,

आरोग्य केंद्रात पूर्ण कर्मचारी पदे भरलेली नाहीत, सद्यस्थितीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर अतिरिक्त भार येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावी अशी मागणी करत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या भारती भोये, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, अरुण मेढे, रवींद्र भोये, मुक्तार शेख आदी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com