जि.प. आणि सामाजिक संस्थांचा सामंजस्य करार

जि.प. आणि सामाजिक संस्थांचा सामंजस्य करार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme)अंतर्गत ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी व योजना विस्तारासाठी जिल्हा परिषद नाशिक व प्रगती अभियान सामाजिक संस्था (Zilla Parishad Nashik and Pragati Abhiyan Social Society) यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी या सामंजस्य कराराचे वाचन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी प्रथम या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यानंतर प्रगती अभियान सामाजिक संस्थेच्या अश्विनी कुलकर्णी यांनी यावर स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार तीन वर्षांसाठी असणार आहे.

यामध्ये दिव्यांग कल्याण संबंधित योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समाजकल्याण विभाग व हौसला सामाजिक संस्था यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी या सामंजस्य कराराचे वाचन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी व हौसला सामाजिक संस्थेचे तेजस चव्हाण यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार तीन वर्षांसाठी असणार आहे.

बोधचिन्हाचे अनावरण

महिला व बालकल्याण विभागतर्फे बेटी बचाव, बेटी पाढाव लोगोचे अनावर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व माजी अर्थ व बांधकाम समिती सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आनंदराव पिंगळे, रवींद्र परदेशी (ग्रामपंचायत), जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com