ग्रामस्थांकडून बीएसएनएलच्या उपमहाप्रबंधकांना निवेदन

ग्रामस्थांकडून बीएसएनएलच्या उपमहाप्रबंधकांना निवेदन

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील ठाणगाव (Thangaon) येथे बीएसएनएलच्या (BSNL) ग्राहकांना रेंजअभावी मनस्थाप सहन करावा लागत असून

जनसेवा सेवाभावी संस्थेचे पदाधिकार्‍यांनी बीएसएनएलच्या उप महाप्रबंधक कुलकर्णी (BSNL Deputy General Manager Kulkarni) यांची भेट घेऊन निवेदन (memorandum) देत सेवा सुरुळीत करण्याची मागणी केली. 20 दिवसांत याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा (agitation) इशारा देण्यात आला आहे.

गावातील बीएसएनएलची केबल लाईन (cable line) वारंवार तुटत असल्याने टॉवरही (tower) बंद पडत असते. त्यामुळे येथील ग्राहकांना मनस्थाप सहन करावा लागतो. गावात अनेक जण बीएसएनएलची सेवा (BSNL service) वापरत आहेत. अनेक विद्यार्थी (students), व्यावसायिक, ऑनलाईन कामे (online work) करणारे यावर आधारित आहेत. मात्र, अनेकदा रेंज जात असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गावांतील बँक ऑफ महाराष्ट्र, शाळा, पाताळेश्वर पतसंस्था, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था, तलाठी कार्यलय, ग्रामपंचायत कार्यलय व अनेक सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनाही यामुळे फटका बसत आहते. नेटवर्क (network) मिळत नसल्याने आर्थिक व्यवहार रखडत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना आपला पैसा बँकेतून काढता येत नसल्याने अडचण निर्माण होतेय. ऑनलाईन पेमेंटसाठी (Online payment) वापरण्यात येणारे फोन पे, गुगल पे हे अ‍ॅप देखील चालत नसल्याने ग्रामस्थांमधून बीएसएनएलच्या सेवेवर नाराजी व्यक्त करत आहेत.

यासाठी ग्रामस्थांनी कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना तात्काळ ही सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. 20 दिवसांत सेवा सुरळीत न झाल्यास लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावर कुलकर्णी यांनी 15 दिवसाच्या काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. सेवाभावाचे अध्यक्ष रामदास भोर, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष योगेश शिंदे, जनसेवाचे उपाध्यक्ष मुकुंद काकड, विशाल काकड, दीपक पाटोळे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com