नाशिक | रोहित ताहाराबादकर

केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या तरतुदीच्या घोषणेनंतर सर्व स्तरातून स्मार्ट नाशकात निओ मेट्रो धावणार असल्याचे स्वागत झाले. असे असताना संपर्काचे प्रभावी माध्यम असलेल्या सोशल मीडियामध्ये मात्र, गमतीदार मिम्स व्हायरल झाल्या आहे...

नाशिक शहर हे मुंबई पुण्यापेक्षा लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या तुलनेने लहान आहे. एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी दुचाकीने १५ ते २० मिनिटात शहरातून बाहेर पडणे सध्याच्या घडीला शक्य होत आहे.

त्यामुळे सध्याच्या नाशिकमधील आल्हाददायक वातावरणात मेट्रोची सध्या गरज नसल्याचा सूर सध्या नागरिकांन कडून व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे अनेक नाशिककरांनी शहरात येणाऱ्या काळात नाशिकमध्ये मोठे उद्योग, आयटी पार्क उभारणीसाठी पायाभूत सुविधेचा एक भाग म्हणून मेट्रोचे जोरदार स्वागत केले आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक नविन रस्ते विकसित करण्यात आले. त्यामुळे शहरात वाहतूक ही जलद झाली. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी नविन पर्यायी रस्ते उपलब्ध झाल्याने वाहतूकीच्या वेळात बचत झाली आहे.

महानगरपालिकेने नुकत्याच नव्या बस विकत घेतल्या आहेत. त्या अजून रस्त्यावर उतरल्या नसताना मेट्रोची घोषणा कशी झाली असावी यामध्ये नाशिककर काहीसे संभ्रमात दिसून येत आहेत.

मंत्र भूमी ते तंत्र भूमी अशी नाशिकची ओळख असल्याने शहराच्या भविष्याचा विचार करता दिवसेंदिवस शहर हे झपाट्याने वाढत जाणार आहे.

त्यादुष्टीने मेट्रो ही अत्यंत महत्त्वाची असल्याने शहरात नविन उद्योग येण्यास मदत होणार आहे. मुंबई पुण्यानंतर झपाट्याने विकसित होत असलेल्या शहराच्या यादीत नाशिक शहर प्रथम येत असल्याने मेट्रोचा प्रकल्प शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे.

सोशल मिडीयावर मेट्रोच्या बाजूने तर काही विरोधात सुरू झालेल्या मिम्सने शहरात चर्चेला उधान आले आहे.

'येवढ्या लवकर जाऊन करायचं काय' असा गमतीदार मिम सध्या व्हायरल होतं आहे. प्रत्येकाच्या स्टेटसवर हे मिम्स झकळत आहेत.

व्हायरल झालेले काही मिम्स

जुन्या ट्रामसेवेला उजाळा

मेट्रोला संमती मिळताच नाशिक ट्रामसेवेच्या आठवणी जाग्या झाल्यात. १८८९ नाशिकमध्ये ट्राम सेवा सुरू करण्यात आली. त्यावेळी ती कलकत्ता, मुंबईपाठोपाठ भारतातली तिसरी ट्राम सेवा होती. दोन डबे असलेली ही ट्राम चार घोडे ओढून नेत.

मेनरोडवर जिथे सध्या नाशिक महापालिकेचे कार्यालय आहे. त्याच जागेत ट्रामचे स्टेशन आणि त्यासाठी लागणाऱ्या घोड्यांची पागा होती. या सेवेसाठी ४०० घोडे पागेत ठेवलेले असत. १९३३ साली ट्रामसेवा बंद झाली.

त्यानंतर इतक्या वर्षांनी शहरात ट्राम सारखीच मेट्रो होतं असल्याने जुन्या आठवणीना उजाळा अनेकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिला.