समाजाच्या हितासाठी सभासदांनी घेतला 'परिवर्तन'चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे

समाजाच्या हितासाठी सभासदांनी घेतला 'परिवर्तन'चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

समाजाच्या हितासाठी सभासदांनी ठाकरे - कोकाटे - क्षीरसागर यांच्या 'परिवर्तन' पॅनलला मतदान (voting) करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा चांदवड (Chandwad) येथील ॲड. भरत ठाकरे (Adv. Bharat Thackeray) यांनी काजी सांगवी (Kaji Sagvi)येथील सभासदांच्या सभेत केली. यावेळी सभासदांनी हात उंचावून त्यांच्या भूमिकेला पाठींबा दिला.

व्यासपीठावर नितीन ठाकरे, विश्वास मोरे, भागूजी पाटील ठाकरे, बाळासाहेब पिंगळे, सुनील पाचोरकर, रामकृष्ण पवार, बबनराव पुरकर, विकास पचोरकर, भाऊसाहेब पवार, शशिभाऊ जाधव, डॉ. शिरीष राजे, चंद्रभान महाले, शशीभाऊ जाधव, नंदू बनकर, डॉ. सयाजी गायकवाड आदी उपस्थित होते.

ॲड. ठाकरे म्हणाले की, बारा वर्षांपासून संस्थेत चाललेल्या एककल्ली कारभारास आम्ही सभासद कंटाळलो आहोत. सर्वसामान्य सभासदांकडून (Members) देणग्या मागितल्या जातात. त्या दिल्यावर पावती देखील दिली जात नाही. त्यामुळे सभासदांच्या मुलाबाळांना बाहेर शिक्षणासाठी पाठवावे लागते, अशी खंत व्यक्त करून परिसरातील दीपक ठाकरे, पुंजाराम ठाकरे या सभासदांच्या कुटूंबातील पोराबाळांना उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी (Higher Medical Education) स्वत:चे गांव सोडून बाहेर जावे लागले, तर पुंजाराम ठाकरे या सभासदांस 'मविप्र' च्या (MVP) रूग्णालयातून केवळ असुविधेमुळे खाजगी रूग्णालयात (Private Hospital) हलविण्यात आले, याबाबत माहिती दिली.

यावेळी अशोक सोनवणे, दौलतराव ठाकरे, नितीन उशीर, दिपक रकीबे, विजय फाफडे, एकनाथ उशीर, शंकरराव आहेर, दीपक पाचोरकर, धनंजय तिडके, बाळूमामा पाचोरकर, आदी उपस्थित होते. तर देवळा, उमराणे, वडनेरभैरव, धोडांबे, काजीसांगवी आदी ठीकाणी 'मविप्र'च्या सभासदांचे मेळावे झाले. प्रवीण घुमरे यांनी सूत्रसंचालन केले.

संस्था कर्जबाजारी का? उत्तर द्यावे : ठाकरे

विद्यमान कार्यकारी मंडळाच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार (Neelimatai Pawar) यांना त्यांच्यापुढे बोलणारे लोक चालत नाही. हात वर करून सभासदांचे हक्क डावलत असतील, तर असे संचालक काय कामाचे? असा सवाल अँड. नितीन ठाकरे यांनी केला. नवीन सभासदांना विरोध नाही, मात्र बोगस सभासदांना विरोध आहे. सध्या पन्नास बोगस सभासद असून त्यांच्यासह इतर जिल्ह्यातील सभासदांना मात्र विरोध कायम राहील.ज्या सेवकांचे सदस्यपद रद्द केले,त्यांना सभासदत्व पून्हा देणार‌ असून विनाअनुदानीत सेवेवर असलेल्यांना सन्मानकारक वेतन देवू, असेही ठाकरे यांनी सांगितले.

ठाकरे स्वाभिमानी माणूस : आ. कोकाटे

शिक्षकांच्या सतत बदल्या करून त्यांच्यातील हाडाचा शिक्षक संपविण्याचे पातक पवार परिवाराने केले आहे. ही संस्था प्रामाणिक व निस्पृह विचाराच्या अँड. नितीन ठाकरे यांच्या हातात दिली नाही, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. म्हणूनच ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे आ. कोकाटे यांनी सांगितले. मी जिल्हा बँकेचा चेअरमन असतांना ३५०० कोटी शिल्लक होती, आता अवघे एक हजार कोटी रूपये शिल्लक आहे, मग बँक डबघाईस येतांना चेअरमन कोण होते? त्यावेळी चेअरमन पवारांच्या पँनलमधील केदा आहेरच होते.संस्थेत सत्ता आल्यावर संस्थेची प्रगती तर करूच, पण सभासदांचा मानसन्मान ठेवू.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com