परिवर्तनासाठी सभासद एकवटले

परिवर्तनासाठी सभासद एकवटले

दिंडोरी / अवनखेड । प्रतिनिधी | Dindori

कादवा कारखान्याच्या (kadva factory) निवडणुकीच्या (election) प्रचाराला सुरुवात झाली असुन नुकतेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांच्या उपस्थितीत

प्रचाराचा शुभारंभ अवनखेड (Avankhed) येथे करण्यात आला. यावेळी सभासदांनी तुडुंब गर्दी करत कादवा कारखान्यात परिवर्तनासाठी सभासद एकवटले असल्याची प्रचिती दिसून आली असून यंदा परिवर्तन करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सभासदांनी केला.

यावेळी अध्यक्षस्थानी अ‍ॅड. बाजीराव कावळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, भाऊलाल तांबडे, नितीन आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक नरेंद्र जाधव यांनी केले. यावेळी उमेदवार सुरेश डोखळे, निवृत्ती मातेरे, सचिन बर्डे, नरेंद्र जाधव, प्रमोद देशमुख, श्रीपत बोरस्ते,

अनिल जाधव, बाळकृष्ण पाचोरकर, गोरख घुले, संपतराव वक्ते, विजय वाघ, निवृत्ती घुले, वसंत जाधव, मनोहर सोनवणे, विजय मोरे, छाया भुसाळ, रामदास धात्रक यांनी आपल्या मनोगतात सत्ताधार्‍यांचे चुकीचे धोरण व कार्यपद्धती यावर निशाणा साधत शरसंधान केले. यावेळी सभासदांना प्रत्येक उमेदवाराने आपापली ओळख देवून परिवर्तन पॅनलच्या (parivartan panal) उमेदवारांना निवडून देण्यासाठी सभासदांना आवाहन केले. सुत्रसंचालन अ‍ॅड. विलास निरघुडे यांनी केले तर आभार योगेश बर्डे यांनी मानले. यावेळी हजारोंच्या संख्येने सभासद उपस्थित होते.

प्रवीण जाधव, हर्षवर्धन कावळे, दिलीप जाधव यांचा पाठींबा

पारदर्शक कारभार म्हणता आणि नेतृत्वाला दोन ठिकाणी उमेदवारी भरावी लागते. चुकीच्या पध्दतीने विरोधकांच्या उमेद्वारीवर आक्षेप घ्यावा लागतो, यातच सर्व दिसून येते. न्यायालयात आम्हाला न्याय मिळाला. परंतु थोडा उशीर झाल्याने आमची उमेदवारी कायम राहिली पण पॅनलची निशाणी आम्हाला मिळाली नाही.सभासदांच्या भवितव्यासाठी सत्ताधार्‍यांना हद्दपार करत सभासदांनी विमान या निशाणीलाच पसंती द्या, असे आवाहन करत प्रविण एकनाथ जाधव, दिलीप पंडितराव जाधव, हर्षवर्धन राजेंद्र कावळे या उमेदवारांनी परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा दिला.

शेतकरी हितासाठी परिवर्तनला साथ द्या केंद्र सरकार नेहमी सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पुढाकार घेत असून त्यामुळेच सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. कादवा कारखाना शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाचा कारखाना असुन शेतकर्‍यांच्या विकासासाठी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना साथ देत विमान निशाणीला पसंती देवून भरघोस मतांनी विजयी करा.

- डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

श्रीराम नावाप्रमाणे वागत नाही आजचा श्रीराम नावाप्रमाणे वागत नसून सत्तेसाठी पावलापावलावर खोटे बोलत असल्याची खंत आहे. बैल आणि हेल्याची जोडीने औत हाकत शेती करणार्‍याला राजकारणात आणुन मोठं केलं आणि त्यानेच माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले हा इतिहास आहे. तेव्हा या खोटेपणाचा प्रतिकार करून कादवाच्या विकासासाठी परिवर्तन पॅनलच्या विमान निशाणीला पसंती देत कादवा कारखान्यात परिवर्तन घडवा.

- अ‍ॅड. बाजीराव कावळे, माजी चेअरमन कादवा कारखाना

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com