नववर्षाच्या सुरूवातीला मेगाब्लॉक

नववर्षाच्या सुरूवातीला मेगाब्लॉक

पंचवटीसह राज्यराणी, नंदीग्राम गाड्या दोन-तीन दिवस रद्द

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

मध्य रेल्वे Central Railway ठाणे-दिवा Thane- Diva Railway Stationदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील वळणासाठी कळवा आणि दिवा दरम्यान 24 तासांचा ब्लॉक घेणार आहे. रविवारी (दि.2) रात्री दोनपासून ते सोमवारी (दि.3) पहाटे दोनपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर हा ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे नाशिककरांची पंचवटीPanchavati Express, राज्यराणी, नंदिग्राम या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या

- दि. 1 जानेवारीला प्रवास सुरू होणारी अमरावती-मुंबई, नागपूर-मुंबई सेवाग्राम, नांदेड- मुंबई राज्यराणी रद्द.

दि. 2 जानेवारीला प्रवास सुरू होणारी मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, मुंबई-अमरावती, मुंबई-नागपूर सेवाग्राम, मुंबई-गदग, मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस रद्द.

3 जानेवारीला प्रवास सुरू होणारी आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, गदग-मुंबई एक्सप्रेस रद्द. दरम्यान, एसटीचा संप सुरु असलेला संप आणि रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

दि. 1 जानेवारीला सुटणारी हुबळी-दादर एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल.

दि. 2 जानेवारीला सुटणारी दादर-हुबळी एक्सप्रेस दादर ऐवजी पुण्याहून निघेल.

दि. 1 जानेवारीला सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल आणि दि. 2 जानेवारीला सुटणारी मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबई ऐवजी पुण्याहून सुटेल.

ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना अनुक्रमे ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवली येथून सुटणार्‍या/टर्मिनेट होणार्‍या लोकल सेवा उपलब्ध नसतील. ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा स्थानकाच्या जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील.

Related Stories

No stories found.