निर्यातवाढीसाठी आयमात संमेलन

निर्यातवाढीसाठी आयमात संमेलन
देशदूत न्यूज अपडेट

सातपूर । प्रतिनिधी Satpur

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातंर्गत केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागामार्फत Through the Commerce Department of the Central Government येत्या शुक्रवारी (दि.24) जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांच्या निर्यातवाढीसाठी export growth संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

आयमा हाऊस (AIMA House) येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत हे संमेलन होणार आहे. जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजक व निर्यात वाढीसाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना, प्रोत्साहने, निर्यातीसंबंधात बँकांची भूमिका व सहाय्य, निर्यातीसंबंधी विविध टप्पे व प्रक्रिया आदींबाबत विविध तज्ञ, संबंधित शासकीय विभाग, बँका व विदेश व्यापार महानिर्देशालय, पुणे यांचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

Related Stories

No stories found.