
नाशिक | प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्वानुमते सुट्टीचे नियोजन करणे सुट्टयाचे वार्षिक नियोजन मे अखेर पर्यंत होणे अपेक्षीत आहे. अशी सुचना मुख्याध्यापक संघाकडून करण्यात आली. मुख्याध्यापक संघासह इतर संघटना पदाधिकाऱ्यांची शिक्षणाधिकारी कार्यालयात सभा झाली. त्यात मुख्याध्यापक संघाचे शिबिर घेणे, सर्व संघटनांची एकत्र सभा बोलावून प्रलंबित प्रश्न सोडवणे यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात सर्व संघटना पदाधिकारी, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, उपशिक्षणाधिकारी, रमेश अहिरे, अधिक्षक सुधीर पगार, पी . यु . पिंगळकर , तसेच मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देशमुख,प्रदीप सांगळे, गोरख कुनगर, शिक्षक भारतीचे के. के. अहिरे, शिक्षक संघटनेचे मोहन चकोर, शिक्षक सेनेचे संजय चव्हाण, राजेंद्र निकम, इस्तूचे पदाधिकारी रोहित गांगुर्डे, , मुख्याध्यापक संघाचे, बी के नागरे, एस एस भालेराव, अनिल माळी उपस्थित होते.
यावेळी उपशिक्षणाधिकारी प्रकाश अहिरे, शिक्षण निरीक्षक उदय देवरे,यांचे शिक्षक संघटनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षणाधिकारी कार्यालयात उपशिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक सारखी पदे रिक्त होती, त्यामुळे कार्यालयीन कामकाज धिम्या गतीने सुरू होते, आता शिक्षण विभागातील अधिकारी वाढल्याने, शिक्षकांच्या सभांचे आयोजन करणे, शाळा तपासणी, नवीन शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षकांमध्ये मार्गदर्शन करणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मान्यता, डी एड टु बी . एड वेतन श्रेणी , नाव बदल प्रस्ताव , संच मान्यता दुरुस्ती, मेडीकल बीलां सह फरक बीले फाइल मंजुर करणे , पदे वाढल्यामुळे कोणत्याही कामात दप्तर दिरंगाई होऊ नये. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.