
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिकमध्ये 2027 साली होणार्या कुंभमेळ्याची ( Kumbhmela-2027 )तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. तर मागच्या कुंभमेळ्याप्रमाणे यंदाही तांत्रिक मदतीने कुंभथॉनची (Kumbhthon ) तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि.23) विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game )यांनी चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
नाशिकमध्ये यापूर्वी भरलेल्या कुंभमेळ्यात फुटफॉल काऊंटींगपासून अन्य अनेक कामांत कुंभथॉनचे तांत्रिक पाठबळ मिळाले होते. त्या माध्यमातून कुंभमेळ्याचे नियोजन करणे आणि अंमलबजावणी करणे शक्य झाले होते. त्यामुळे यंदाही अशाच प्रकारे कुंभमेळ्याच्या तयारीबराबेरच कुंभथॉनची तयारी देखील सुरू झाली आहे. दुपारी 4 वाजता अशोका बिझनेस स्कूल येथे चर्चासत्र होणार आहे.