
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा बँकेकडून (Nashik District Bank) जुलमी कर्ज वसुली (Debt recovery) होत असल्याचा आरोप करत या विरोधात अतिशय आक्रमक आंदोलनाची (agitation) दिशा ठरवण्यासाठी रविवार दि. 25 डिसेंबर रोजी वणी (vani) ता. दिंडोरी (dindori taluka) येथे खंडेराव मंदिरामध्ये सकाळी 11 वाजता संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील (nashik district) शेतकऱ्यांची (farmers) महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.
या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची (agitation) दिशा ठरवली जाणार आहे. तरी प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे.या शेवटच्या आरपारच्या लढाईत सहभागी व्हावे,असे आवाहन संदीप जगताप, शेतकरी संघटचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोऱ्हाडे,गंगाधर निखाडे,प्रशांत कड,वसंतराव कावळे,संतोष रेहरे,भोजराज चौधरी यांनी केले आहे.