उद्योगांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक - आ. कोकाटे

उद्योगांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक - आ. कोकाटे

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

बंद उद्योग सुरू करण्यासंदर्भातील Regarding starting a closed industry धोरणात्मक निर्णय, सेझ डी नोटिफिकेशन, औद्योगिक वसाहतीचे रस्ते, पाणी व वीज प्रश्न सोडविण्यासाठी येत्या 15 दिवसात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात संबंधित विभागाच्या मंत्री, अधिकार्‍यांसह बैठक घेऊन उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही आमदार माणिकराव कोकाटे MLA Manikrao Kokate यांनी दिली.

सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीमध्ये STICE उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपिठावर प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा सुधा माळोदे, उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य संजय शिंदे, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, माजी चेअरमन पंडितराव लोंढे, अविनाश तांबे, संचालक सुनील कुंदे, मिनाक्षी दळवी, रामदास दराडे, प्रभाकर बडगुजर, व्यवस्थापक कमलाकर पोटे, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता डोंगरे, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, मुसळगावचे उपसरपंच अनिल सिरसाट उपस्थित होते.

दिलीप शिंदे वसाहतीचे चेअरमन असताना शासन दरबारी अनेक समस्या मांडून त्या मी सोडवल्या आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षात वसाहतीमध्ये दहशत व राजकारण वाढल्याने उद्योजक समस्या घेऊन येण्यास धजावत नव्हते. स्टाइसने राजकारणाचा अड्डा उद्ध्वस्त करुन उद्योजकांना पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे.

नाशिक-पुणे, नाशिक-शिर्डी या चौपदरी रस्त्यांबरोबरच समृध्दी महामार्ग, प्रस्तावित सुरत-चेन्नई ग्रिनफिल्ड महामार्ग, नाशिक-पुणे रेल्वेचे सिन्नर जवळ दोन किमी लांबीचे होत असलेले स्टेशन, त्याचप्रमाणे ओझर व शिर्डी विमानतळांना जोडणारा रस्ता चौपदरी करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेली मागणी या सर्वांमुळे उद्योगनगरीला पोषक वातावरण तयार होणार असून त्याचा फायदा घेत सुर्यभान गडाख यांनी उभी केलेली वसाहत आशिया खंडात नावारुपाला येईल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन कोकाटे यांनी प्रशासकीय मंडळाला केले.

वाढीव पाणी मागणी संदर्भातील एकरक्कमी भरावयाच्या 3 कोटी 19 लाख रुपये रक्कमेचे 10 हप्ते करुन मिळावे, रस्ते दुरुस्ती, बंद उद्योग सुरु करण्यासंदर्भातील अटी शिथिल कराव्यात, औद्योगिक वसाहतीचा डी-प्लस झोनमध्ये समावेश व्हावा आदी मागण्या माळोदे यांनी मांडल्या. कोरोना काळात छोट्या उद्योगांना घोषित करण्यात आलेले अनुदान आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी उद्योजिका मिश्रा यांनी केली.

मुसळगाव ग्रामपंचायतीचा प्रतिनिधी औद्योगिक वसाहतीवर घेण्याची मागणी उपसरपंच अनिल सिरसाट यांनी केली. विष्णु खताळे यांनी वारंवार खंडीत होणार्‍या वीज पुरवठ्याची समस्या मांडली. त्यावर आ. कोकाटे यांनी विज वितरणचे कार्यकारी अभियंता डोंगरे यांना विजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना केल्या. 220 के.व्ही. क्षमतेचे वीजकेंद्र सुरु करण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. क्रीडा संकुलात उद्योजकांसाठी क्लबसह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच महिला उद्योजिका, बचत गटांसाठी पॅकिंग व विक्रीसाठी क्लस्टर उभारण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

गडाख नानांचे स्मारक व्हावे...

गडाख नानांनी उभ्या केलेल्या संस्थेत त्यांचे स्मारक व्हावे यासाठी वारंवार केलेल्या प्रयत्नांना विरोधकांनी खो घातल्याचे माजी चेअरमन पंडित लोंढे यांनी भावूक होत सांगितले. तोच धागा पकडून आमदार कोकाटे यांनी गडाख नानांची दूरदृष्टी चांगली असताना त्यांच्या स्मारकाला विरोध करणे तसेच त्यांच्याबद्दल वाईट बोलणे अशोभनीय असल्याचे सांगितले. नानांनी कठीण परिस्थितीत उद्योगनगरी उभी केली. नानांनी उभ्या केलेल्या या संस्थेत त्यांचे चांगले स्मारक व्हावे यासाठी औद्योगिक वसाहतीच्या फंडातून त्याची तरतुद करावी, उद्योजकांकडून कुठलाही पैसा त्यासाठी घेऊ नये अशी सूचना त्यांनी केली. वसाहतीच्या सुरक्षा भिंतीसाठी अनावश्यक केलेल्या दोन कोटी रुपयांच्या खर्चावरही त्यांनी ताशेरे ओढले.

राजकारणाचा अड्डा व्हायला नको...

उद्योजकांना संरक्षण देणे, त्यांचे प्रश्न सोडविणे ही उद्योजकांमधून स्टाईसवर निवडून आलेल्या उद्योजक प्रतिनिधींची जबाबदारी असते. दुदैवाने गेल्या 5 वर्षात स्टाईस राजकारणाचा अड्डा बनला. परिणामी उद्योजकही आपले प्रश्न घेऊन येण्यास धजावेना ही परिस्थिती यापुढे बदलून दहशत कमी करुन पुर्वी प्रमाणेच उद्योजकांना बरोबर घेऊन तालुक्याचा विकास साधला जाईल, अशी ग्वाही आमदार कोकाटे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com