असंघटित कामगार नोंदणीबाबत बैठक

असंघटित कामगार नोंदणीबाबत बैठक

कामगार उपायुक्त माळी यांचे मार्गदर्शन

सातपूर । प्रतिनिधी Satpur

असंघटित कामगारांची नोंदणी इ-पोर्टलवर Registration of unorganized workers on e-portal यापूर्वीच सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 31 डिसेंबरपर्यंत इ-श्रम पोर्टलवर E-Shram Portal नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भात कामगार भवन नाशिक येथे विभागाचे कामगार उपायुक्त Deputy Commissioner of Labor of Nashik विकास माळी Vikas Mali यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात नोंदणी अभियानाची बैठक झाली.

यावेळी उपायुक्त माळी यांनी बैठकीस उपस्थितीत कामगार संघटनांच्या पदाधिकार्‍यांना सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने असंघटित कामगार, बांधकाम कामगार, स्वयंसहाय्यता गटाचे सभासद, घर कामगार, आशा कर्मचारी, वृत्तपत्र विक्रेते, टपरीधारक, हॉकर्स, रिक्षाचालक, वीटभट्टी कामगार, भाजीपाला विक्रेते, शेतमजूर, गरीब शेतकरी, दुकानातील कामगार अशा सर्वांची नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीला गती आणण्यासाठी तालुकास्तरावर मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, नगरपंचायत, महापालिका या सर्व स्थानिक स्वराज संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित कामगार संघटनांचे पदाधिकारी, पक्षीय पदाधिकारी यांनी विविध उपाययोजनांद्वारे ही मोहीम सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उपायुक्त माळी यांनी सकारात्मक उत्तरे देऊन शंका निरसन केले. या बैठकीत सीटूचे सीताराम ठोंबरे, सिंधू शार्दूल, मोहन जाधव, मीडियाप्रमुख ललित आहेर, मंगला भंडारी, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक गौरव पाटील, भारतीय मजूर संघाचे विजय वाघ, आदींसह अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com