क्षयरुग्णांना पोषण आहार देण्याबाबत बैठक

क्षयरुग्णांना पोषण आहार देण्याबाबत बैठक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान (Tuberculosis Free India Campaign ) अंतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहार देण्याबाबत नुकतीच मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली मनपात विशेष बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांनी क्षयरुग्णांना पोषक आहार देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी सामाजिक बांधिलकी जपत क्षय रुग्णांचे ‘निक्षय मित्र’ व्हावे, असे आवाहन केले.

मनपाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी सध्या मनपा क्षेत्रात 1200 क्षयरुग्णांना पोषण आहार देण्याची गरज आहे. क्षयरोग नियंत्रण विभागामार्फत रुग्णालयनिहाय रुग्णांची माहिती ‘निक्षय मित्र’ यांना देण्यात येईल. त्यानुसार पोषण आहाराचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती दिली. यावेळी जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. हर्षद लांडे यांनी पोषण आहार बास्केट, शासनाच्या मार्गदर्शक सूचना, पोषण आहाराची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांचे आणि शंकेचे निरसन केले. नियोजन करून योग्य प्रकारे आहार वाटपाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

बैठकीत सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी माजी नगरसेवक जगदीश पाटील, गुरमित बग्गा, सलीम शेख, दीक्षा लोंढे, अमोल पाटील, ‘इंडोलाईन’च्या सपना पाटील, अंबड इंडस्ट्रियल असोसिएशनचे सचिव ललित बुब, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सोनल रॉय, स्वर्गीय हरी भाऊ गीते फाउंडेशनच्या दीपाली गिते, कमल फाऊंडेशनचे औटे, डिशचे श्रीकांत कुलकर्णी, आयएपीचे अध्यक्ष डॉ. केदार मालवतकर, नरडेको अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुशील गावडे, मनीषा विसपुते तसेच समता सामाजिक विकास संस्था आणि रोटरी क्लब वेस्ट या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com