पांजरपोळच्या जागेसंदर्भात १३ तारखेला बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन
पांजरपोळच्या जागेसंदर्भात १३ तारखेला बैठक
USER

सातपूर | Satpur
चुंचाळे (Chunchale Shiwar) शिवारात असलेल्या पांजरपोळ (Panjarpol Land) च्या भूखंडावर सिडकोच्या (CIDCO) माध्यमातून नवीन शहर निर्माण करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector Nashik) पांजरपोळ ट्रस्ट च्या व्यवस्थापकांना (Panjrapol trust Management) सोबत मंगळवारी (दि 13) बैठकीचे (Meeting) आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात (In Collector Office) करण्यात आले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी नवीन शहर निर्माण करण्यासाठी पांजरपोळच्या जागेचा प्रस्ताव (Proposal for Panjarpol site) ठेवला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बैठकीचे (Spcial Meeting) आयोजन केले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत या बैठकीसाठी नाशिक पंचवटी पाजरपोळ ट्रस्टचे (Panchavti Panjrapol Trust) व्यवस्थापक, नाशिक मनपा आयुक्त, तहसिलदार नाशिक, विभागीय अधिकारी, नवीन नाशिक यांना बोलावण्यात आले आहे.

बैठकीला प्रतिनिधी न पाठवता स्वतः हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी (दि.१३) सकाळी ११:३० वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

वृक्ष बचाव संघटनेचा विशेष पाहणी दौरा
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वृक्ष संवर्धन व वृक्ष बचाव संघटनेच्या माध्यमातून पांजरपोळ च्या जमिनीवरील वृक्षसंपदा व त्यांची स्थिती पाहण्यासाठी विशेष भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटी दरम्यान शहरातील वृक्षप्रेमी पांजरपोळ ट्रस्टचे पदाधिकारी यांनी संयुक्तपणे परिसराच्या संपूर्ण भागाची बसच्या माध्यमातून फेरी देऊन पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर वृक्षतोड करू दिली जाणार नाही अशी भूमिका जगबीर सिंग यांनी स्पष्ट केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com