
नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना ( Maharashtra State Onion Growers Farmers Association)व कांदा उत्पादक शेतकरी, विखरणी यांच्यातर्फे शनिवार दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता विखरणी (ता.येवला) येथे ग्रामपंचायत कार्यालय विखरणी कांदा उत्पादक शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष संस्थापक भारत दिघोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.या मेळाव्यात कांदा शेतीचे भवितव्य व कांदा विक्री व्यवस्था याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.