राष्ट्रवादी उद्योग-व्यापारी सेलची बैठक

राष्ट्रवादी उद्योग-व्यापारी सेलची बैठक

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ( Assembly Vice President Narhari Jhirwal ) यांच्या अध्यक्षतेखाली व कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष रामजी शेटे, सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या उपस्थितीत उद्योग व व्यापार सेलचीआढावा बैठक ( Industry and Trade Cell Review Meeting ) संपन्न झाली.

यावेळी नरहरी झिरवाळ यांनी उद्योग-व्यापार सेल हा समाजासाठी महत्वाचा घटक असून पक्षबांधणी सूक्ष्म पद्धतीने करावी व सर्व समाजातील घटकांना न्याय दयावा असे सांगितले.

श्रीराम शेटे यांनी नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो व कांदा ही नगदी पिके या नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने घेतली जातात. परंतु सर्वात मोठी अडचण येथील शेतकर्‍यांची आहे ती म्हणजे बरेच व्यापारी सुरुवातीला विश्वास संपादन करतात. नंतर शेतकर्‍यांचे पैसे बुडूवून पसार होतात, अशा बर्‍याच केसेस नाशिक जिल्ह्यात व महाराष्ट्रातील काही भागात आहे. नंतर कोर्ट केसेस चालू होतात शेतकर्‍यांना न्याय लवकर मिळत नाही. तरी या सेलच्या माध्यमातून शेतकर्‍यांना न्याय द्यावा असे सांगितले.

यावेळी नागेश फाटे यांनी व्यापारी वर्गाचे ओळखपत्रसह विमा संरक्षण संदर्भात तसेच तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन आपण मार्ग काढू असे सांगितले. यावेळी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी, विश्वनाथ देशमुख, मधुकर गटकळ, ओझरखेड सरपंच गंगाधर निखाडे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब गणोरे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com