निकोप वातावरणात परीक्षा घ्या: गोसावी

मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची राज्य शिक्षण मंडळासोबत बैठक
निकोप वातावरणात परीक्षा घ्या: गोसावी

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

दहावी व बारावीच्या परिक्षेंसाठी मुख्य केंद्राहून (Main center for examinations) उपकेंद्रावर प्रश्न पत्रिका (Question Magazine) नेणे व आणण्यासाठी अडचणी येणार नाही याची दक्षता घेवुन विद्यार्थ्यांच्या (students) मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी केंद्र संचालकांनी (Center Director) प्रयत्न करणे गरजेचे आहे.

दोन्ही बोर्डाच्या परिक्षा (Board Exams) निकोप वातावणात पार पाडण्याचे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे (State Board of Education) अध्यक्ष शरद गोसावी (sharad gosavi) यांनी केले. नुकतीच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Education) कार्यालयात अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळांच्या (

All Maharashtra Headmasters Joint Corporations) पदाधिकार्‍यांची सभा गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राज्य सचिव डॉ.अशोक भोसले यांची प्रमुख उपस्थितीत होती. सभेमध्ये मार्च 2022 च्या परीक्षा ऑफलाईन (Offline Exam) पद्धतीने करण्याबाबत नियोजन करण्यात आले.

मान्यता वर्धित व कायम मान्यता कमीतकमी पाच वर्ष करणे, बोर्ड मान्यता शुल्क कमी करणे, काही बोर्डपेपर दुपारी 3 ते 7 पर्यंत असल्याने रात्री विद्यार्थ्यांना येणार्‍या समस्या मंडळाचे काम व्यवस्थित होणेकरीता मंडळ सदस्य नियुक्त करणे, यापुढे परीक्षा पेपर्स मधील वेळापत्रकातील कालावधी कमी करणे, विद्यार्थ्यांच्या मनामधील परीक्षेची भिती दूर करून मनाची तयारी करून घेणे, आपल्या केंद्रावर परीक्षामय वातावरणाची तयारी करणे,

विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा वापर करू नये व इतर घटकांचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन गोसावी यांनी सर्व केंद्र संचालकांना केली. मुख्याध्यापक संघानी मांडलेल्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील याबाबत गोसावी यांनी आश्वासन दिले. यावेळी मुख्याध्यापक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी,

राज्य अध्यक्ष मारोती खेडेकर, सचिव नंदकुमार बारवकर, वसंत पाटील,पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, विदर्भचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, सचिव सतीश जगताप, उपाध्यक्ष विलास भारसाकळे, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष युनुस पटेल, हिंदुराव जाधव, मनोहर पवार, दत्तात्रय कदम, किरण माष्ट, डी. पी. कदम उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com