
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
'रेशन दुकानदारांचा (Ration shopkeepers) प्रश्न जिव्हाळ्याचा असून तो प्रश्न आमच्या विचाराधीन आहे. लवकरच दुकानदारांना खूष खबर देऊ, असे आश्वासन राज्याचे प्रधान सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच वित्तीय सलागार मनोज कुमार शेटे (Financial advisor Manoj Kumar Shete) यांनी दिले.
विधानसभा उपाअध्यक्ष नरहरी झिरवळ (Legislative Assembly Deputy Speaker Narhari Zirawal) यांच्या दालनात माजी मंत्री जयत पाटील (Former Minister Jayat Patil), आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar), यांच्या समवेत ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज फेडरेशन, पुणे (All Maharashtra Fair Fries Federation, Pune) यांच्या प्रतिनिधीसमवेत दुकानदारांच्या कमीशन व दुकानदारांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली. झिरवळ साहेब यांनी मुख्यमंत्री (Chief Minister), उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) व प्रधान सचिव शेटे यांच्याशी भ्रमनध्वनी वरून संपर्क साधला.
त्यावर शेटे यांनी 'रेशन दुकानदारांचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे आणि तो प्रश्न आमच्या विचाराधीन आहे. लवकरच दुकानदारांना खूषखबर देऊ असे त्यांनी सागितले. दुकानदाराना माल वेळेवर व वजन करून मिळावा. कोनतेही दुकान काढले जानार नाही. असा कोनताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही. फक्त नावीन रद्द दुकाने यांचा विचार केला जाईल. तेव्हा दुकानदाराने घाबरण्याचे काही कारण नाही,असे शेटे यांनी सागीतेले.
बैठकीला नरहरी झिरवळ यांचे सचिव तसेच ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज शॉप किपर फेडरेशनचे अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, नाशिक जनरल सेक्रेटरी बाबुराव म्हमाने ( सोलापूर ),अशोकराव एडके (नांदेड ), निवृत्ती कापसे ( नाशिक ), शंकर सुरोशे ( ठाणे ), शुभाष मुसळे (नागपूर ), हरिष गुप्ता, अरून बागडे, सुदाम पवार, देविदास पगारे ,राहुल गायकवाड ,अमोल धात्रक व प्रतिनिधी उपस्थित होते .