
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एक एकरावरील मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये 20 टक्के घरांचे आरक्षणाखाली (reservation) एलआयजी (LIG) व एमआयजी (MIG) गटातील लोकांसाठी ठेवणे बंधनकारक केलेले आहे.
या संदर्भातील आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाच्या (Maharashtra Housing Department) मुख्यालयात बुधवारी मनपा आयुक्तांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्याच्या गृहनिर्माण विभागाने 4,000 चौरस मीटरवरील आणि त्याहून अधिक महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाकडे (म्हाडा) हस्तांतरित केलेल्या अश्या फ्लॅटच्या संख्येबद्दल मनपा कडून तपशिल मागविला आहे.
2013 साली तात्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awad) यांनी मोठ्या गृह प्रकल्पांची माहीती मनपाकडे मागितली होती. अश्या प्रकल्पांची सविस्तर माहीती पूरवली न गेल्याने तात्कालीन आयुक्त कैलास जाधव यांना बदलीला सामोरे जावे लागल्याचे बोलले जात होते. त्यानंतर हे प्रकरण थंड बस्तात अडकलेले होते. गृहनिर्माण विभागाने पून्हा नव्याने याबद्दलची माहीती पूरवण्याचे निर्देश देत या संदर्भात मुंबईला बुधवारी (दि.22) बैठक बोलावलेली आहे.
प्रत्यक्षात मनपाच्या माद्यमातून मंंजूर बांधकाम प्रकल्पांची माहीती म्हांडा देणे क्रमप्राप्त होते. त्या घरांचे वाटप हे म्हाडाच्या माध्यमातूनच केले जात असते. या संदर्भात आजची स्थिती जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.