नाशिक-पुणे रेल्वेसंदर्भात मानोरीत बैठक

रेल्वे
रेल्वे

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या (Nashik-Pune Railway) जमिंनींचे संपादन (Acquisition of lands), जनजागृती (public awareness), प्रोत्साहन देण्यासाठी तहसिल प्रशासनाच्यावतीने (Tehsil Administration) मानोरी (manori) येथे ग्रामपंचायत जवळच्या सभागृहात 1 वा. शेतकरी (farmers) व अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन केले आले आहे.

शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी असलेल्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे भुसंपादनास (Land Acquisition of Nashik-Pune Railway) सुरुवात झाली असली तरी अनेक शेतकर्‍यांनी अद्याप जमीनी न दिल्याने प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे.

यासाठी मानोरी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत दोन्ही गावातील ज्या शेतकर्‍याची जमीन रेल्वे मार्गात (railway line) संपादित होणार अशा शेतकर्‍यांना आपली जमिन थेट खरेदी पद्धतीने संपादित करता येणार आहे.

यावेळी अधिकार्‍यांकडूनही यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच याबाबत प्रश्न व अडचणीबाबत मदत करण्याकरिता निवासी नायब तहसिलदार सागर मुंदडा (Deputy Tehsildar Sagar Mundada), मंडळ अधिकारी भाऊसाहेब शिरसाठ, तलाठी, महारेल कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com