नाशिकच्या आयटी हबसाठी बैठक; केंद्राची मिळणार मदत

नाशिकच्या आयटी हबसाठी बैठक; केंद्राची मिळणार मदत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या NMC वतीने आयटी कंपन्यांसाठी IT Companies कॉमन फॅसिलिटी सेंटर Common Facilities Center, कन्व्हेंन्शन सेंटर Convention Center , रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, आयओटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सेंटर ऑफ एक्सलन्स फोर एग्रीटेक, फिनटेक, प्रॉडक्ट गॅलरी, इंक्युबेशन सेंटर, व अनेक सोयीसुविधांनी सुसज्ज असे "प्लग ॲंड प्ले सॅटेलाईट"Plug and Play Satellite officesऑफिसेस असलेल्या बहुउद्देशीय केंद्र स्थापन व्हावे, या उद्देशाने उद्योग मंत्रालय विभागDepartment of Industry , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC, महानगरपालिका, नाशिक आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक झाली.

महापौर सतीश कुलकर्णी Mayor Satish Kulkarni यांच्या अध्यक्षतेखाली व भारत सरकारच्या सुक्ष्म लघु व माध्यम उद्यम बोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकार यांच्या समन्वयातून ही बैठक झाली. महापौर कुलकर्णी यांनी उपक्रमाची संकल्पना सांगितली. याप्रसंगी प्रामुख्याने केंद्र शासनाच्या योजना व सहकार्य यासंबंधी उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत यांनी माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी यासाठी आवश्यक ती कारवाई सुरू केली असून लवकरच या विषयाची मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.

महापालिकेच्यावतीने ज्या सोयी सुविधा प्रस्तावित जागेत व संपूर्ण परिसरात देण्यात येणार आहेत. त्याविषयीची माहिती टाऊन प्लॅनिंग प्रमुख सी. बी. आहेर यांनी दिली तसेच बाविस्कर यांनी आयटी पार्क संबंधात नियमावली व मंजुरी संदर्भात माहिती विशद केली. नगरसेविका हिमगौरी आडके यांनी शहराच्या विकासासाठी आयटी कंपन्याचा विस्तार कसा महत्वाचा आहे त्याची माहिती दिली. या ठिकाणी आयटी कंपन्यांच्या सोयीसाठी व विविध कॉमन फॅसिलिटीज संबंधी नीता असोसिएशनचे माजी अध्यक्ष व उद्योजक अरविंद महापात्रा यांनी आराखडा सादर केला.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे विभागीय अधिकारी नितीन गवळी व कार्यकारी अभियंता बोरसे यांनीही आवश्यक ते सहकार्य होणार अशी ग्वाही दिली. सुक्ष्म लघु व मध्यम उद्यम बोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकर यांनी महापौरांनी नाशिक साठी अत्यंत उपयुक्त अशा घेतलेल्या पुढाकाराला केंद्र शासनाच्या माध्यमातून कॉमन फॅसिलिटी सेंटर तसेच टेक्नॉलॉजी सेंटर इत्यादी योजनेसाठी असलेला निधी मंजूर करून आणण्याची ग्वाही दिली. नाशिक आयटी असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद कुलकर्णी यांनी आभार मानले.

महापौर म्हणून नाशिकच्या औद्योगिक व आयटी विकासासाठी केलेल्या संकल्पाला मूर्त रूप येत आहे. याकामात सर्व अधिकारी वर्ग, उद्योजकांनी सहकार्य करावे व नाशिकचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हावे.

सतीश कुलकर्णी, महापौर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com