
दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp
शांती मिळविणे, सकारात्मक व ऊर्जावान उत्साही राहण्यासाठी जास्त मेहनत व खर्च करण्याची आवश्यकता नाही. फक्त थोडावेळ ध्यानधारनेत (Meditation )बसून स्वतःची ओळख प्राप्त करायची व परमात्मा सोबत आपले तादात्म्य साधायचे, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी हुसेन दीदी (Brahmakumari Hussain Didi ) यांनी केले.
देवळाली रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब व जनकल्याण फाउंडेशन (Deolali Rotary Club, Innerville Club and Janakalyan Foundation )यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पूज सिंधी पंचायत सभागृहात आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी हुसेनदीदी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी वासंती दीदी होत्या. याप्रसंगी सिंधी पंचायत अध्यक्ष रतन चावला, उपाध्यक्ष मनोहर कृष्णानी, ब्रह्माकुमार दिलीप बोरसे, रोटरीचे अनंत अथनी, हितेश कारिया, सुंदरमन, अशोक शिरगांवकर तसेच रोटरी क्लबच्या अध्यक्ष नंदिनी कारिया, मनीषा दोशी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष संध्या सुंदरमण, जनकल्याण फाउंंडेशनच्या अध्यक्षा नाजनीन तारवाला आदी उपस्थित होते.
यावेळी हुसेनदीदी यांनी सांगितले की, संपूर्ण दिवसभर कोणत्याही परिस्थितीचा प्रभाव आपल्या मनावर पडू नये यासाठी रोज आपले कपडे स्वच्छ करतो. त्याच प्रकारे सकाळी उठून आपण काही काळ मेडिटेशन केल्यास आपल्यातील दूषित विचार व नकारात्मक विचार धुतले जाऊन शुद्ध पवित्र चांगल्या विचारांची रुजवण मनामध्ये करू शकतो. अध्यक्षीय संबोधनात ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी राजयोग मेडिटेशनचे महत्त्व विशद केले.
रतन चावला यांनी दिल्ली येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या ओम शांती रिट्रीट सेंटरला 200 सिंधी पंचायत सदस्य व इतर भाविकांना घेऊन मेडिटेशन शिबिर करण्याचा मानस व्यक्त केला. प्रास्ताविक नंदिनी कारिया, सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी गोदावरीदीदी, स्वागत मीरादीदी तर आभार निवेदिता अथणी यांनी मानले.