दवाखान्यातील वैद्यकीय कचरा रहिवाशी भागात

नागरिकांमध्ये संताप
कचरा
कचरा

जुने नाशिक | Old Nashik

द्वारका पासून जवळच असलेल्या एका मोठ्या हॉस्पिटलच्या मागील बाजूस दवाखान्यातील कचरा तसेच वापरलेल्या साहित्य रहीवाशी भागात टाकण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच या गंभीर प्रकारामुळे दहशत देखील माजली आहे. प्रशासनाने त्वरित या ठिकाणी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहेत

 द्वारका पासून काही अंतरावर असलेल्या या मोठ्या दवाखान्यातील वैद्यकीय कचरा गेल्या काही दिवसापासून मागील बाजूस असलेल्या रहिवासी भागात टाकण्यात येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. अगोदरच करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात दहशत आहे. आता दवाखान्यातील कचरा थेट लोकांच्या समोर येत असल्यामुळे त्यात भर पडली आहे.

तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दखल घेऊन संबंधित दवाखान्याला सूचना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com