देवळालीत डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुरू

डडेंग्यू निर्मूलन मोहिमेला सुरवात
देवळालीत डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुरू

देवळाली कॅम्प | Deolali Camp

एकीकडे करोना (Corona) तर दुसरीकडे डेंग्यू (Dengue) अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या देवळाली शहरात (Deolali City) कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Containment Board) वतीने डेंग्यू निर्मूलन मोहीम (Dengue eradication campaign) हाती घेण्यात आली आहे. त्याच बरोबर जनतेने घ्यावयाची काळजी याचे देखील प्रबोधन (Awairness) केले जात आहे.

पावसाळा (Rainy Season) सुरू झाल्याने साथीच्या रोगांचे प्रमाण (Epidemic diseases) वाढू लागले आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आरोग्य विभागा (Health Department) कडून सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात करोना असताना प्रशासनाने कडक उपाययोजना करीत तो आटोक्यात आणला. मात्र विषम वातावरनामुळे साथीचे रोग वाढत आहेत. त्यातच डेंग्यूच्या रुग्ण (Dengue Patients) झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवड्यात शहरातील विविध भागात तब्बल ३५ हुन अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे.

त्यांच्यावर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात (Private Hospitals) उपचार सुरु आहेत. ही संख्या वाढू नये यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात येऊन उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाने स्वच्छता अभियानाबरोबर( Cleanness Campaign) डेंग्यूची जनजागृती करण्यासाठी माहिती देणारे पत्रके (Pamphlets) छापत शहरातील सर्व दुकानदार यांचे पर्यन्त पोहचविले जात आहे.

या पत्रकांच्या माध्यमातून डेंग्यू डासांपासून होत असल्याचे सांगत त्याची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांबाबत याचे मार्गदर्शन केले जात आहे. काल बाजार परिसरात असलेल्या विविध दुकानाचे आजूबाजूला पडलेले जुने टायर जमा करण्यात आले.

ही मोहिम मुख कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांचे मार्गदर्शना खाली आरोग्य निरीक्षक अमन पटेल, जिग्नेश सिंघनिया अतुल मुंडे यांचे नेतृत्वाखाली विनोद खरालीया, गौतम सारस, रोहीत थामेत, मंगेश घोरपडे, रोहित तायडे, सतीश भालेराव आदी राबवित आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com