Video : नाशिकमधील आजच्या वाऱ्याचा वेग किती? सकाळपासून पडला इतका पाऊस

Video : नाशिकमधील आजच्या वाऱ्याचा वेग किती? सकाळपासून पडला इतका पाऊस

नाशिक | प्रतिनिधी

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कालपासून वातावरणात कमालीचा बदल बघायला मिळत आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण असून तपमानातही कमालीची घट बघायला मिळाली आहे. रात्रभर सोसाट्याचा वारा नाशिकसह परिसरात सुरु होता...

सकाळी ८ वाजेपासून नाशिक शहराच्या काही भागात पावसाच्या सरीदेखील कोसळल्या. यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला असून हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी ८.३० वाजेपासून ते ११.३० वाजेपर्यंत नाशिक परिसरात १८ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत.

असा मोजतात वाऱ्याचा वेग...

तसेच सकाळी ८.३० ते ११.३० वाजेपर्यंत १ मिलीमीटर पावसाची नोंददेखील झाल्याची माहिती दिली आहे. रात्री ८.३० ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत या १२ तासांत १ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती.

यानंतर सकाळी अवघ्या तीन तासांतच १ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे दिवसभरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com