'या' मागण्यांसाठी माकपचे धरणे आंदोलन

'या' मागण्यांसाठी माकपचे धरणे आंदोलन

हरसूल । वार्ताहर | Harsul

हरसूल (harsul) येथे त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्या (Trimbakeshwar Taluka Kisan Sabha) वतीने माकपचे जिल्हा सचिव इरफान शेख (District Secretary Irfan Sheikh) यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा व धरणे आंदोलन (agitation) करण्यात आले.

यावेळी विविध मागण्याचे निवेदन (memorandum) तहसीलदार दीपक गिरासे (Tehsildar Deepak Girase), गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी (Group Development Officer Dr. Sarika Bari) यांना देण्यात आले.

हरसूल (harsul) येथे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास माकपच्या वतीने हरसूल शहरातून भव्य रॅली (Rally) काढण्यात आली.तसेच हरसूल - नाशिक महामार्गावरील (Harsul - Nashik Highway) आद्यक्रांतीकारक बिरसा मुंडा चौकात भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पिण्याच्या व सिंचनाचा प्रश्न, घरकुल, निराधार, विधवा पेन्शन, खावटी, नवीन रेशन कार्ड, वीज, वीजबिल, घरपट्टी आदी मुख्य मागण्यासह बोगस आदिवासींच्या भरतीच्या ठिकाणी खर्‍याखुर्‍या आदिवासी युवकांची भरती (Recruitment of tribal youth) करावी, विशेष भरती मोहीम लावणार असल्याची हमी द्यावी, जल जीवन मिशन (jaljeevan mission) अंतर्गत रेंगाळलेली कामे त्वरित सुरू करावी अशी मागणी करण्यात आली.

सचिव इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेकरांनी अनेक प्रश्न तसेच अनेक विभागाच्या तक्रारींचा पाढा वाचत धारेवर धरले. भर उन्हात अधिकार्‍यांना मोर्चेकर्‍यांनी ताटकळत ठेवल्याने अधिकार्‍यांना पुरता घाम आला.तसेच प्रश्नाचं भडिमार करत मोर्चेकरांनी दुपटी वार केले. यावेळी तहसीलदार दीपक गिरासे यांना विविध मागण्याचे निवेदन (memorandum) दिले. दुपारी तीन वाजेनंतरही भर उन्हात विविध मागण्यांसाठी मोर्चेकरांनी धरणे आंदोलन (agitation) चालूच ठेवले होते.

यावेळी सचिव इरफान शेख, जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ, उपसभापती देवराम मौळे, माजी प. स. सभापती ज्योती राऊत, लक्ष्मण कनोजे, जयवंत राऊत राऊत आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मोर्चेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिकारी गणेश वारुळे यांच्या अध्यक्षतेखाली हरसूल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

No stories found.