नाशिक | Nashik

एमएएच एमबीए, एमएमएस सीईटी प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाने फुल टाइम एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जाच्या तारखा जाहीर केल्या.

शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ संलग्न आणि खासगी विनाअनुदानित संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

एमएएच एमबीए, एमएमएस सीईटीच्या तारखांनुसार, उमेदवार २५ डिसेंबर पर्यंत अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर नोंदणी करू शकतात आणि प्रमाणपत्र अपलोड करू शकतात. महाराष्ट्र राज्य सीईटी सेल २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२० या कालावधी दरम्यान एमएएच एमबीए, एमएमएस प्रवेशासंबंधी तक्रार दाखल करण्याची संधी देखील देणार आहे.

'शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी तंत्रशिक्षणांतर्गत एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरीता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अखिल भारतीय उमेदवारी प्रकारामध्ये प्रवेशाकरीता एटीएमए, एमएटी, एक्सएटी, जीएमएटी या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना दिनांक २५/१२/२०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी देण्यात येत आहे.

तसेच सदर कालावधीमध्ये इतर अन्य परिक्षेच्या विद्यार्थ्यांनाही वरील अभ्यासक्रमासाठी नोंदणीची सोय उपलब्ध राहील. अधिक माहितीसाठी सीईटीच्या http://mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी.