नाशिक शहर करोनामुक्त करण्याचा महापौरांचा निर्धार

नाशिक शहर करोनामुक्त करण्याचा महापौरांचा निर्धार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर करोनामुक्त करण्याचा निर्धार महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. करोनाच्या सुरवातीच्या काळापासून प्रथम नागरिक तथा महापौर नात्याने कामकाज करीत असतांना करोना संबंधित अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने त्यावर रामबाण उपाय शोधण्यासाठी शहरातील नामंवत योगाचार्य यांचे समवेत संवाद साधुन चर्चा केली.

चर्चेअंती भारतीय ऋषीमुनिंनी हजारो वर्षापुर्वी ग्रंथामध्ये लिहुन ठेवेलेले योग प्राणायाम व आयुर्वेद औषधे या प्रादुर्भावाला दूर ठेवून शकते, असे योगविदयाधाम गुरुकुलचे संस्थापक योगमहर्षी डॉ. विश्वासराव मंडलिक यांनी मत व्यक्त केले आहे.

योग प्राणायाम व जलनेती याचे महत्व व विचार करता नाशिक शहर करोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी नित्य नियमाने सातत्य ठेवून जलनेती व योग प्राणायाम या क्रिया केल्यास करोना त्रासापासून निश्चितच शहर दूर राहु शकेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे. या करीता नागरिकांनी आपली दिनचर्या पुढीलप्रमाणे ठेवल्यास नागरिक करोना बाधीत होणार नाही.

यामध्ये दररोज सकाळी 10 वर्षापुढील कुटुंबातील सर्वांनी स्नानापुर्वी जलनेती हि क्रिया शिकून घ्यावी व नियमित करावी. हे करतांना साधारण कोमट पाण्यात चिमुटभर सैंधव मिठ मिश्रीत करावे. व त्यानंतर नाकपुडीव्दारे ही क्रिया करावी याची सविस्तर माहीती आवश्यक वाटल्यास यु-टयुब चॅनेल वरुन आत्मसात करुन त्याप्रमाणे केल्यास किंवा योगाचार्यांचे मार्गदर्शन घेउन क्रिया केल्यास सोपे होईल. ही क्रिया घरी राहणार्‍यांनी दिवसातून एक वेळ सकाळी करावी व कामानिमित्त बाहेर राहणार्‍या व्यक्तींनी सकाळी बाहेर पडण्यापूर्वी व संध्याकाळी घरी आल्यानंतर स्नान व जलनेती केल्यास करोनामुक्त रहाता येते, असा अनुभव आहे.

प्राणायाम हा दररोज 45 ते 60 मिनिटे सकाळी करावा, सकाळी शक्य न झाल्यास सायंकाळी करावा यामध्ये ओमकार, दिर्घश्वसन, कपाल भाती,भस्त्रिका,अनुलोम विलोम व भ्रमरी प्राणायामाचे प्रकार दररोज करावे (15 वर्षाखालील मुला मुलींनी कपाल भाती करु नये) याबाबतही आवश्यकता वाटल्यास यु-टयुब चॅनेल किंवा योग तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात यावे.

घरापासुन घरापर्यंत नाक व तोंड पुर्ण क्षमतेने झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरावा. तसेच वापरात असलेला मास्क वारंवार स्वच्छ धुतलेला असावा. एक महीन्यानंतर दुसर्‍या मास्कचा वापर करावा आणि शासनाचे इतर सर्व नियमांचे काटेकोरपणे अंमबलबजावणी करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे.

आपल्या दैनंदिन जिवनामध्ये वरील बाबी लक्षात घेता नियमितपणा व शिस्त् स्वत:ला लाउन घेणे अतिशय गरजेचे असल्याचे नमुद करुन याप्रमाणे क्रिया केल्यास नाशिक शहरातील नागरीक निश्चितच करोना सारख्या आजारापासुन दुर राहु शकणार व करोनामुक्तीकडे निश्चितच वाटचाल करणार असल्याचे मत महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com