आनंदवली बांधकामाची आज महापौरांंकडून पाहणी

बांधकाम व्यावसायिकाला प्रशासनाची अंतिम नोटीस
आनंदवली बांधकामाची आज महापौरांंकडून पाहणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील सुमारे दोन महिन्यांपासून चर्चेत असलेल्या आनंदवल्ली Aanandvalli शिवारातील सर्वे क्रमांक 65 मध्ये गोदापात्रात सुरू असलेल्या वादग्रस्त बांधकामाचा construction in godavari river विषय आजच्या महासभेत मनसेना ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख Corporator Salim Shaikh यांनी उपस्थित करीत चौकशीची मागणी केली. त्याला सेना गट नेते विलास शिंदे, सुधाकर बडगुजर यांनीही दुजोरा देत त्वरीत कामाची चौकशी करण्याची मागणी केली. यावर महापौर सतिष कुलकर्णी Mayor Satish Kulkarni यांनी आज (दि. 14) सकाळी 12 वाजता अधिकारी व सदस्यांसह प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

दरम्यान प्रशासनाने दोन दिवसांपुर्वीच संबधिक बिल्डरला अंतीम नोटीस बजावली असून समाधानकारक उत्तर न आल्यास परवानगी रद्द करण्याची कारवाई होणार असल्याची माहिती नगररसचना विभागाचे अधिकारी सी.बी. आहेर यांनी सभेत दिली. मनसेना नगरसेवक शेख यांनी संतप्त होऊन या बांधकामाला परवानगी कशी मिळाली? संबंधितांवर काय कारवाई केली गेली? यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारले.

यावेळी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आज (दि. 14) महापौरांसह शिष्टमंडळ पाहणी करणार असून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे जाहीर करण्यात आले. 14 गुंढे जागा ही गोदापार्कसाठी राखीव करण्यात आलेली आहे, मात्र प्रत्यक्ष जागेवर ही जागाच नसल्याचा दावा शेख यांनी केला. नदीपासून काही अंतरावर बांधकामाला परवानगी नसते, मात्र आनंदवली येथील हा बांधकाम थेट नदीपात्रात कसे चालू आहे, एकाला एक व दुसर्याला दुसरे न्याय कसे, असा प्रश्न सेना गट नेते शिंदे यांनी उपस्थित करुन आताच प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली.

नगरसेवक सलीम शेख यांच्या लढ्यामुळे गोदापात्रात अनधिकृत बांधकाम उभारल्याच्या मुद्यावरून या बांधकामाला परवानगी देणाजया नगररचना विभागाने जागा मालक अशोक सोपे, शिंदे अ‍ॅण्ड शिंदे बिल्डर्स व वास्तुविशारद संजय नाईक यांना नोटीस बजावली होती, मात्र त्याचे उत्तर न मिळाल्याने दोन दिवसापूर्वी त्यांना अतिम नोटीस बजावण्यात आली उत्तर न आल्यास परवानगी रद्द करण्याची मागणी कारवाई होणार आहे.

गोदावरी नदी पात्रात बांधकामे होत असल्याचे दिसत असून डिएलआर व टिएलआर मार्फत जागेची मोजणी करावी व सात दिवसात अहवाल सादर करावा, अन्यथा बांधकाम परवानगीवेळी सादर केलेल्या दस्तऐवजात त्रुटी आढळल्यास बांधकाम परवानगी रद्द केली जाईल, असा इशारा या नोटीसीद्वारे देण्यात आला आहे. आनंदवली शिवारातील सर्वे क्रमांक 65/1/1 अ मध्ये सुरु असलेल्या बांधकामावरून गेल्या महिनाभरापासून वादंग सुरू आहे. मनसेना नगरसेवक शेख यांनी स्थायी समितीच्या दोन सभेत हा मुद्दा उपस्थित करत अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी उपअभियंता संजय अग्रवाल यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com