नाशिक | प्रतिनिधी

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असून या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह मनपा पदाधिकारी व साहित्य क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली...

नाशिक मध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथील गोखले एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणातील इंजिनिअरिंग कॉलेज समोरील पटांगणात होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्या जागेची पाहणी करण्यात आली.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या समवेत सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, गजानन शेलार, शाहू खैरे, नगरसेवक गुरुमीत बग्गा,समीर कांबळे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, शंकर बोऱ्हाडे, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, देवदत्त जोशी, गिरीश नातु, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते.

यावेळी या मराठी साहित्य संमेलनाची तयारीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.त्यामध्ये उपस्थित पदाधिकारी विविध मुद्यांवर चर्चा केली.

त्यात नाशिक शहरात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होऊन एक वेगळा ठसा उमटेल यादृष्टीने सर्वांच्या सहभागातून हे संमेलन यशस्वी करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली.

यावेळी बोलताना महापौर कुलकर्णी यांनी सांगितले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असून यामध्ये जगातून व भारतातून येणाऱ्या साहित्यिकांन मध्ये नाशिकचा एक वेगळा ठसा उमटेल अशा पद्धतीने नियोजन केले जाईल. नियोजन करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल असे यावेळी स्पष्ट केले.