कर्तव्यदक्ष सरपंच आईच्या कुशीतून ९ दिवसाच्या मुलीने पाहिला गावकीचा गाव कारभार!

नऊ दिवसांच्या बाळासह मासिक मिटींगला महिला सरपंचाची उपस्थिती; मायदरा ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा बांबळे यांचे सर्वत्र कौतुक
कर्तव्यदक्ष सरपंच आईच्या कुशीतून ९ दिवसाच्या मुलीने पाहिला गावकीचा गाव कारभार!

शेनित | त्र्यंबक जाधव

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या मायदरा-धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे यांनी आपल्या नऊ दिवसांच्या लहान बाळासह ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थिती दर्शवली...

मायदरा-धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे या एका मुलीला जन्म देऊन नऊ दिवसांपूर्वीच बाळंत झाल्या असून मंगळवार (ता.२९) दरम्यान, ग्रामपंचायतची मासिक मीटिंग अजेंडा देऊन आयोजित करण्यात आलेली होती.

या मासिक मिटींगला सरपंच पुष्पा बांबळे यांनी आपल्या जन्म दिलेल्या नऊ दिवसांच्या गोंडस मुलीसह ग्रामपंचायत मासिक मिटींगला सामाजिक अंतर राखत उपस्थित राहिल्या.

या मासिक मीटिंग मध्ये सरपंच बांबळे यांनी गाव विकासाच्या दृष्टीने गावातील पाणी पुरवठा, लाईट प्रश्न,दलित वस्तीतील मंजूर पथदीप विकास कामे,घरकुल योजने संदर्भात सविस्तर माहिती, गावातील शिवार रस्ते या प्रश्नासंदर्भात आढावा घेतला.

दरम्यान, नुकतेच नऊ दिवसांच्या जन्म दिलेल्या बाळासह सरांच पुष्पा बांबळे या ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थित राहिल्या व त्यांनी गाव विकासाची कामे मीटिंगमध्ये मांडली. या त्यांच्या कार्यामुळे ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक नितीन हेंबाडे, ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रभागा बहिरु केवारे, ग्रामपंचायत सदस्य लंकाबाई बांबळे, गंगाराम करवंदे आदींसह ग्रामस्थांनी सरपंच पुष्पा बांबळे यांचे स्वागत करून अभिनंदन आभार व्यक्त केले.

दरम्यान, एक लोकप्रतिनिधी या नात्याने गावातील ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे त्यांचे विविध प्रश्न शासन स्तरावर मांडणे हे माझं कर्तव्य समजते असे यावेळी सरपंच पुष्पा बांबळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी यावेळी मीटिंग दरम्यान सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे,उपसरपंच

चंद्रभागा बहिर केवारे, लंकाबाई विठ्ठल बांबळे, गंगाराम करवंदे,साहेबराव बांबळे, बहिरु केवारे, ग्रामविकास अधिकारी नितीन हेंबाडे ,ग्रामपंचायत कर्मचारी गोरख धोंगडे,रंगनाथ लोहकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com