प्रवेश
प्रवेश
नाशिक

अकरावी विज्ञानसाठी १० हजार जागा

अकरावी प्रवेशासाठी नाशकात एकूण २५ हजार २५० जागा

Bharat Pagare

नाशिक | Nashik

अकरावी प्रवेशासाठी नाशिक शहरात एकूण २५ हजार २५० जागा उपलब्ध झाल्या असून, यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या १० हजार १६०, वाणिज्यच्या ८ हजार ६००, कलाशाखेच्या ४ हजार ९१० व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या (एचएसव्हीसी) १३६० जागांचा समावेश आहे.

महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये वरील जागा उपलब्ध असून, यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये ११ हजार ५५०, विनाअनुदानितमध्ये ८ हजार १६० व स्वयंअर्थसहाय्यमध्ये ५ हजार ३२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी रविवार (दि.२६)पासून आॅनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू झालीनअसून, या अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रियाही (दि. १) आॅगस्टपासून सुरू झाली आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतरही अकरावी प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याच्या वेळापत्रकाविषयी मात्र अद्याप अनिश्चिता आहे.

यापूर्वी अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून (दि.१५) सुरू होणार होती. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन झाल्याने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु, त्यानुसारही प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया होऊ शकली नाही.

दुसऱ्यांदा सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया १ आॅगस्टपासून सुरू केली जाईल असे आदेश काढण्यात आले. परंतु, यापूर्वी शिक्षण विभागाकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-२ भरता येणार असल्याचे सांगितले जात होते.

बुधवारी (दि. २९) दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १ आॅगस्चपासून अकरावीच्या प्रवेशअर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र भाग दोन भरण्याच्या वेळापत्रकाविषयी अनिश्चतता निर्माण झाली आहे. भाग १ मध्ये वैयक्तिक माहिती नोंदवायची आहे. भाग दोनमध्ये महाविद्यालयांचे पर्याय (पसंतीक्रम) नोंदविता येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com