मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

२३८ विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

नाशिक । Nashik

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय (Matoshri Engineering College) एकलहरे (eklahare) येथील विदयार्थ्यांनी (students) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या यशाची (success) घोडदौड निरंतर चालू ठेवत या चालू शेक्षणिक वर्षात महाविद्यालयातील एकूण २३८ विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये (national & international companies) निवड (Selection) झाली आहे...

या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागामार्फत (training and placement department) महाविद्यालयामध्ये 'गौरव समारंभ' (Pride Ceremony) आयोजित केला होता. यावेळी महाविद्यालयाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ. निलेश घुगे (Dr. Nilesh Ghuge) यांनी महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली व चालू असलेल्या मुलाखतींचा ( interview) तसेच यापुढे येणार असलेल्या कंपन्या यांचा इत्यंभूत आढावा सादर केला.

यांनतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे (Principal Dr. Gajanan Kharate) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. नोकरी (JOB) निवडताना पगाराची तुलना केली पाहिजे म्हणजे त्यातून विद्यार्थी आत्मपरीक्षण करून स्वतः मध्ये बदल करून अधिक चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता, तसेच महाविद्यालयातील जुनिअर विद्यार्थ्यांना पास होत असलेल्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन (Guidance) करावे कि जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा नोकरीच्या उत्तम संधी मिळतील. महाविद्यालयातील मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी अधिक मुलांची निवड झाली याबद्दल त्यांनी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे विशेष कौतुक केले. समाजातील प्रत्येक वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीची संधी मिळावी यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते हे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक (Parents and teachers) यांच्यामध्ये सुसंवाद असणे फार गरजेचे आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात पालकांना पाल्याचे संगोपन करताना महाविद्यालयातून मदत मिळाली तर विद्यार्थी अधिक चांगले यश संपादन करू शकता असेही त्यांनी स्पष्ट केले. कम्युनिकेशन म्हणजे काय हेही त्यांनी विद्यार्थ्यांना उदाहरण देऊन स्पष्ट केले. प्रामाणिक दृष्टिकोन तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल असा विश्वास त्यांनी मुलांना दिला. महाविद्यालयातून मिळालेल्या नोकरीचा सुरुवातीला ज्ञानार्जनासाठी वापर करावा त्यावेळी मिळणारा पगार हा गौण समजावा म्हणजे भविष्यात नोकरीच्या अधिकाधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले. यानंतर उपप्राचार्य डॉ. वर्षा पाटील यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे, उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील, माहिती आणि तंत्रज्ञान शाखेचे प्रा. निरंजन भाले, आर्टिफिशल इंटेलिजन्स शाखेचे डॉ. जयंत चोपडे, यांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख डॉ. जयंत भंगाळे, स्थापत्य शाखेचे विभागप्रमुख डॉ. अमोल सनेर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचे डॉ. देविदास दिघे, डॉ. ज्ञानेश्वर अहिरे, महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. निलेश घुगे, तसेच सर्व विभांगांचे समन्वयक प्रतीक सोनावणे, विश्वास वाडेकर, हिरालाल पवार, पूनम ढोली, सोमनाथ हाडपे, मोनिका देशमुख आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com