मातोरीच्या सुळा डोंगरावर पुन्हा वणवा;अथक प्रयत्नांच्या अंती वणवा आटोक्यात

मातोरीच्या सुळा डोंगरावर पुन्हा वणवा;अथक प्रयत्नांच्या अंती वणवा आटोक्यात

नाशिक | Nashik

नाशिक तालुक्यातील मातोरी गावच्या (Matori Gaon) उत्तरेस असलेल्या सुळा डोंगरास (Sula Mountain) दुसऱ्यांदा चहूबाजूने वणवा (Fire) लागला. या वणव्यात येथील वनक्षेत्रातील उभी झाडे, तसेच सुळयाचा चारही बाजूने कुरण व जैवविविधता जळून खाक झाली आहे. दुपारी दोन वाजता लागलेला वणवा तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नाने जीव घोक्यात टाकून पर्यावरण मित्रांनी विझवला.या वणव्यात शेकडो एकरवरील वनसंपदा, जैवविविधता, पक्षी, दुर्मिळ झाडे, गवत,वन्यजीव जळून खाक झाले....

वणव्यात जीव धोक्यात टाकून सातत्याने वणवा (Fire) विजवणारया पर्यावरण मित्रांची साधी दखल ही पर्यावरण, वनप्रशासन घेत नाही,अशी खंत यावेळी पर्यावरण मित्रांनी व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) या दोन महिन्यात ब्रम्हगिरी, मायना डोंगर, मातोरी गायरान, मोरधन, हरसूल घाट, रामशेजवर दोनवेळा व णवा, संतोषा, सुळा डोंगर वनक्षेत्रात दोनदा वणवा लागला.

या वाढत्या घटना मानवी विकृतांनी घडवल्या असून याबाबत अजूनही वणवा लावणारे मोकाट आहेत. वणवा रोखण्यासाठी वणवा मुक्ती अभियान केवळ कागदावरच असल्याने "नेमीच येतो वणवा"असे गृहीत धरून त्याकडे अजूनही गांभीर्याने बघितले जात नसल्याची खंत पर्यावरण प्रेमी संस्थांनी व्यक्त केली आहे.

सुळा डोंगराला वणवा (Fire) लागल्याची घटना कळताच वणवे वन विभागाला कळवून दऱ्यादेवी पर्यावरनाचे भारत पिंगळे,शिवाजीभाऊ धोंडगे,वृक्षमित्र तुषार पिंगळे,शिवकार्य गडकोट संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, वनरक्षक देशपांडे, मातोरीचे लक्ष्मन लोखंडे, सुरज लोखंडे, आशेवाडीचे एकनाथ बेडकुळे यांनी जीव धोक्यात टाकून तब्बल तीन तासांच्या अथक श्रमाने लागलेला वनवा पोत्याने झोडपून विझवला .सायंकाळी सात वाजता सुळा डोंगराचा वणवा आटोक्यात आणला.

आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) ,वनविभाग,जिल्हा पोलीस अधीक्षक याना पत्रव्यवहार केला असूनही अजूनही वन,पर्यावरण विभागाने वणवा मुक्तीसाठी ठोस उपाय व वणवा लावणारे गुन्हेगार पकडले नाहीत,वणव्यात झालेल्या नुकसानीचे वास्तव परीक्षण अहवाल होत नाही.जिल्हाधिकारी निर्मित टास्क फोर्स च्या लघुगटाच्या अहवालात ही मी स्वतःमाझ्या लघुगटाच्या अहवालात डोंगर,टेकड्या वनक्षेत्रात वणवा लागू नये यासाठी उपायांसह तसेच वणवा लागल्यास त्याची दाहकता कमी व्हावी म्हणून जाळपट्टे उभारणी करावी,वणवा लावणारे उपद्रवीवर गुन्हे नोंदवावे,व जंगल,डोंगर,किल्ले सुरक्षित करून वनपाल नेमावे,वणवा विजवण्यात मागे राहणाऱ्या वनव्यवस्थापन समित्यांना वणवा विजवण्याचे प्रशिक्षण द्यावे,जीव धोक्यात टाकून वणवा विझवणारे हातांचा समाजाने सन्मान करावा,त्यांना याकामी वनविभागाने सुरक्षेसाठी साधन साहित्य द्यावे अशी मागणी आम्ही केली,मात्र याकडे उत्तर तर सोडा उपायही केले जात नाही,याचा परिपाक निसर्ग कोपण्याची नैसर्गिक असमतोल बिघडत आहे,याला कारणीभूत समाज व पर्यावरण विभाग, वन प्रशासन जबाबदार आहे.

राम खुर्दळ-संस्थापक, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था,नाशिक

वनव्याने निसर्गाचा बेसुमार घात होत आहे,जिवापाड जोपासलेलं पर्यावरण डोळयासमोर वणवा लागल्यास भस्मसात होते याची खूप चिंता आहे,आम्ही वणवा विनवण्यात सातत्याने राबतो,मात्र आमच्या कडे कुठलीही सुरक्षा साधने नाहीत,ती वनविभागाने द्यावीत,मात्र तसे होताना दिसत नाही.

भारतभाऊ पिंगळे

आम्ही सातत्याने डोंगर रांगेतील वणवे विझवतो,कारण निसर्ग आमचा जीव आहे,मात्र अजूनही समाज सरकार,प्रशासन गांभीर्याने जागे होत नाही हेच दुर्दैव,आम्ही वणवा मुक्ती साठी झटतो आम्हाला सुरक्षेची साधने द्या,व गाव पातळीवर वणवा मुक्ती साठी प्रशिक्षने घ्या,आम्ही अनुभवाने शिकवू.

शिवाजीभाऊ धोंडगे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com