माथाडी कामगार युनियनचे वेतनवाढीसाठी आंदोलन

माथाडी कामगार युनियनचे वेतनवाढीसाठी आंदोलन
USER

नाशिकरोड । प्रतिनिधी

नाशिकरोड रेल्वे मालधक्का येथील रिपब्लिकन एम्प्लाईज फेडरेशन, माथाडी कामगार युनियन, सीटू कामगार युनियन, राष्ट्रीय दलित पॅँथर युनियनने काल कामबंद आंदोलन केले. माथाडी कामगारांना दोन महिन्यांपासून रखडलेला पगार त्वरित द्यावा, वेतनवाढीचा नवा करार करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होते. जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त कार्यालयाशी चर्चा करुनही मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा आणि मालधक्क्यावर रेशनचे ट्रक येऊ न देण्याचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, आंदोलनाची दखल घेत सायंकाळी कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे, स्टेशनमास्तर आर. के. कुठार, कुंदन महापात्रा, ए. के. पटेल, कार्टिंग एजंट गुल्लूशेठ आनंद, सल्लागार समितीचे सदस्य शिवनारायण सोमानी यांच्या उपस्थितीत पगारवाढीचा करार झाल्याची माहिती कामगार नेते भारत निकम, रामबाबा पठारे यांनी दिली. अनिल आहिरे, दिपक वाघ, नितीन चंद्रमोरे, सुनील यादव, रविंद्र मोकळ, कृष्णा जगदाळे, राजाभाऊ मोकळ, प्रभाकर रोकडे,कैलास भालेराव उपस्थित होते.

रामबाबा पठारे म्हणाले की, गेल्या दोन महिन्यापासून या चारही युनियनच्या कामगारांचा पगार झालेला नाही. करोना असतानाही जीव धोक्यात घालून माथाडी कामगार शासनाचा रेशनचा तांदूळ, गहू, शेतकर्‍यांची खते उतरविण्याचे काम चोवीस तास करतात. त्यांना विमा, वैद्यकीय सुविधा नाहीत. करोना काळात सॅनिटायझर, साबण, औषधे कामगारांनी वर्गणी काढून आणली.

करोनामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला. त्यांचे कुटूंबांकडे शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे कामगारांनी वर्गणी गोळा करुन या कुटुंबांना मदत केली. 2019 साली वेतनवाढीचा करार झाला होता. त्याची मुदत संपली तरी नवीन करार नाही. जिल्हाधिकारी, आरोग्याधिकारी, कामगार आयुक्त कार्यालयाला पत्र देऊनही माथाडींनी सुविधा मिळत नाही, त्यांचे प्रश्न सोडवले जात नाही. कामगारांना सुविधा व न्याय मिळाला नाही तर चारही संघटना रस्त्यावर उतरतील. मालधक्क्याचा आत व बाहेर एकही मालट्रक जाऊ-येऊ देणार नाही. भारत निकम म्हणाले की, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडेही मागण्या पोहचिवण्यात आल्या. त्यांनीही बंदला पाठींबा दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com