एसटी पाठोपाठ आणखी एका संघटनेचा नाशकात संप

एसटी पाठोपाठ आणखी एका संघटनेचा नाशकात संप

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एकिकडे एसटी (State Transportation) सेवकांचा संप सुरु असतानाच दुसरीकडे आणखी एका कामगार संघटनेने अचानकच संप पुकारल्यामुळे मोठ्या अडचणी उभ्या राहण्याची शक्यता वर्तविली जाते आहे...

जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC) माथाडी कामगारांनी (Mathadi Kamgar) अचानक काम बंद आंदोलन (Strike) पुकारले आहे. यामुळे कामगारांअभावी कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास तसेच लिलावात सहभाग घेण्यास नकार दिल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

पिंपळगाव बाजार समितीमध्ये धुळे (Dhule), साक्री (Sakri), नंदुरबार (Nandurbar), मालेगाव (Malegaon) आणि निफाड (Niphad) या ठिकाणाहून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणला जातो. शेतकरी कांदा लिलावाला आणण्यासाठी ट्रॅक्टर भाडे ततत्वावर आणतात. अशातच लिलाव झाला नाही, तर त्यांच्यावर रिकाम्या आल्यापावली माघारी जाण्याची वेळ येते.

इतकंच नव्हे तर, येण्या-जाण्याचे पूर्ण ट्रॅक्टर भाडेदेखील कांद्याची विक्री (Onion Sale) न करताच शेतकऱ्यांना द्यावे लागते आहे. यामुळे आर्थिक फटका बसतो आहे. शेतकरी लिलाव सुरु व्हावेत यासाठी शेतकरी एकवटल्यानंतर लिलाव सुरु करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com