Nashik Fire : टेस्टिंग लॅबला आग; हजारोंचे साहित्य जळून खाक

 Nashik Fire : टेस्टिंग लॅबला आग; हजारोंचे साहित्य जळून खाक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील घनकर गल्ली (Ghankar Galli) कानडे मारुती लेन येथील एका टेस्टिंग लॅबला आज सायंकाळच्या सुमारास आग (Fire) लागल्याची घटना घडली. या आगीत लॅबमधील (lab) हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे...

 Nashik Fire : टेस्टिंग लॅबला आग; हजारोंचे साहित्य जळून खाक
Bus Accident : ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात; १३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, घनकर गल्ली या ठिकाणी टीटी सर्जिकल लॅब (TT Surgical Lab) आहे. त्या लॅबला आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने आगीत लाकडी आणि प्लास्टिक साहित्यासह इतर साहित्य जळून खाक (Burn) झाले. सुदैवाने वाडा रिकामा असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.

 Nashik Fire : टेस्टिंग लॅबला आग; हजारोंचे साहित्य जळून खाक
उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींसह शिंदे-फडणवीसांवर घणाघात; म्हणाले...

दरम्यान, आगीची माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी मदत कार्य सुरू करून अग्निशामक दलाला (Fire Fighters) पाचारण केले. त्यावेळी तात्काळ महापालिकेच्या (NMC) अग्निशामक दलाचे दोन बंब आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एक तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाचे प्रमुख एस. के. बैरागी यांच्या नेतृत्वाखाली लीडिंग फायरमॅन नदीम शेख, एम.डी. कदम, आर. एस. नाकीबे, बी. आर. लासुरे, बी. एन. खोडे, आर. एस. गांगुर्डे यांच्यासह आदी जवानांनी आग आटोक्यात आणली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

 Nashik Fire : टेस्टिंग लॅबला आग; हजारोंचे साहित्य जळून खाक
पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सात जण ताब्यात
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com