
ठाणगाव | वार्ताहर | Thangaon
सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) भेगू सावरपाडा (Bhegu Sawarpada) येथे शनिवार (दि.२१) रोजी पहाटेच्या सुमारास दत्तू पाडवी यांच्या घराला अचानक आग (Fire) लागली असता यामध्ये दोन गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. तसेच या आगीत सुमारे १४ लाख २७ हजार रुपयांचे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही...
याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास घराला आग लागल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले आणि घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक (Burn Materials) झाले. जवळपास आठ ते साडेआठ वाजेदरम्यान ही आग आटोक्यात आली. सदर आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी हांडे, बादलीने पाणी डोक्यावर वाहून आग विझविण्याचे प्रयत्न केले. यावेळी घरातील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas Cylinder Explosion) झाल्याने विजय पाडवी (२८) याचा जागीच मृत्यू झाला.
तसेच आगीमध्ये घरातील (House) सोन्याचे दागिने, रोख रक्कम ७० हजार रुपये, संसार उपयोगी वस्तू असे एकूण सुमारे १४ लाख २७ हजार रुपयांचे नुकसान (Damage) झाले. यावेळी घटनास्थळी तलाठी स्वप्निल पालवी, बाऱ्हे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस हवालदार हिरामण महाले, हाडस यांनी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर विजय पाडवी या युवकाचे जागेवरच शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात राहत्या घरी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.