केटीएचएमकडून जिल्हा रुग्णालयाला देणगी स्वरुपात मास्क

केटीएचएमकडून जिल्हा रुग्णालयाला देणगी स्वरुपात मास्क

नाशिक । Nashik

केटीएचएम महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयाला एक हजार मास्क देणगी स्वरुपात देण्यात आले.

महाविद्यालयाने करोना महामारीच्या काळात विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या अंतर्गत विविध योजना राबविल्या. त्यात आतापर्यंत 8600 मास्कचे गरजूंना वितरण करण्यात आले.

विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करोना काळात मानसिक ताण नियंत्रण कार्यशाळा घेण्यात आली. त्याचप्रमाणे महापालिकेस एक हजार लिटर सॅनिटायझर वितरित करण्यात आले. सुमारे दोन हजार गरजू कुटुंब व स्थलांतरित मजुरांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात करोना तपासणी प्रयोगशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सुमारे 1200 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे 800 चित्रफितींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

महाविद्यालयात प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागास विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एक हजार मास्कची देणगी देण्यात आली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील जिल्हा पर्यवेक्षक सुनीता बोरसे, नरेंद्र पाटील व योगिता खडांगळे हे उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. गणेश मोगल, रासेयो कार्यक्रम अधिकारी डाॅ. राजेंद्र गुंजाळ, उपप्राचार्य डॉ. जे. एस. आहेर, डाॅ. बी. एल. गडाख, डॉ. एन. डी. गायकवाड उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com