Nashik : शहरातील 'या' मंदिरात दर्शनासाठी जात आहात? आधी ही बातमी वाचा

News Update | न्यूज अपडेट
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

शहरातील काळाराम मंदिर संस्थानने (Kalaram Mandir) केंद्र व राज्य शासनाने कोविड 19 (covid 19) संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करून सुधारित विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य प्रसार व संसर्ग टाळण्याच्या हेतूने मास्कचा (mask) वापर करावा व गर्दी टाळावी असे आव्हान केले आहे...

केंद्र व राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानुसार, भाविकांनी करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून मास्कचा वापर करून काळाराम मंदिरात व मंदिर परिसरात प्रवेश करावा व काळाराम मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करावे. याशिवाय भाविकांनी स्वत:ची काळजी घेऊन करोनाचा प्रादुर्भाव टाळावा असे आवाहन काळाराम मंदिर संस्थांनचे अध्यक्ष डॉ. विजय मोरे (Dr. Vijay More) यांनी केले आहे.

दरम्यान, सध्या सुट्ट्या असल्याने मंदिर परिसरात मास्क न वापरता दर्शन घेण्यासाठी गर्दी करणाऱ्या भाविकांची संख्या अफाट आहे. त्यामुळे सामाजिक अंतराचे पालन करून कोविड प्रतिबंधक लसीचे (vaccine) लसीकरण व बूस्टर डोस घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, अशा प्रकारचा सूचना फलक देखील मंदिर संस्थानने प्रवेशद्वारावर लावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com