महागाई विरोधात मार्क्सवादीचे आंदोलन

महागाई विरोधात मार्क्सवादीचे आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

केंद्र सरकार (central government) व राज्य सरकारच्या जनता विरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस घरगुती गॅस (Gas), डिझेल (Diesel), पेट्रोल (petrol) व जीवनावश्यक वस्तूं महाग झाल्या आहेत. यात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.

महागाईविरोधात (Inflation) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे (Marxist Communist Party) शनिवारी (दि.21) विविध ठिकाणी आंदोलन (agitation) करण्यात आले. सातपूर (satpur) विभागात करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.सिंधूताई शार्दुल यांनी केले. यावेळी कॉ.दगडू व्हडगर, कॉ. भिवाजी भावले, काँ.भागवत डुंबरे, काँ. मोहन जाधव, कॉ.संजय पवार, कॉ.गौतम कांबळे, कॉ.विनोद भाऊस्कर आदी सहभागी झाले होते.

नविन नाशिक (navin nashik) भागात झालेल्या आंदोलनात कॉ.आत्माराम डावरे, कॉ.ज्ञानेश्वर काजळे, कॉ.गजानन पाटील, कॉ.तानाजी जायभावे, कॉ.तुकाराम सोनजे, कॉ.संतोष काकडे, कॉ.सतिश खैरनार, कॉ.दीपक कोर, कॉ.अरविंद शहापुरे, कॉ.विवेक ढगे, कॉ.ज्ञानेश्वर माळी, कॉ. संजय माळी, कॉ.दीपक घोरपडे आदी सहभागी झाले होते. मोर्चात विविध ठिकाणी जमलेल्या कामगारांना माकपा राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, राज्य कमिटी सदस्य सिताराम ठोंबरे, अँड.वसुधा कराड, दिनेश सातभाई यांनी मार्गदर्शन केले.

नाशिकरोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळासमोर निर्देशने करण्यात आली. यावेळी हिरामण तलोरे, स्वरुप वाघ, सखाराम साठे, राहुल गायकवाड, शिवाजी फलके, रतन वाळके, राजेंद्र सालवे, अंकुश धिंदळे, संदिप गुंजाळ, किशोर गांगुर्डे विजय गांगुर्डे , गोविंद लचके आदी सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पळसे गावाजवळ तीव्र आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी राजाराम धनवटे, गणेश गायधनी, तुषार खांडबहाले, दिनेश धात्रक, अक्षय कहांडळ, अनिल पेखळे, दिपाली अरींगळे, प्रशांत बच्छाव, मयुर कस्तुरे, ऋषिकेश पिंगळे, गणेश आगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com