वावी । प्रतिनिधी Vavi / Pimparvadi

सिन्नर तालुक्यातील वावी जवळ असलेल्या पिंपरवाडी येथे विवाहितेने दोन मुलींसह आत्महत्या केल्याचा प्रकार आज सायंकाळी घडला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वावा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मनीषा अनिल गायकवाड (25), चार वर्षाची मुलगी ओवी व चार महिन्याची चिमुकली अनवी अशी मृतांची नावे आहेत.

गावालगत असलेल्या बाबासाहेब हाडोळे यांच्या शेतात आज सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान हा प्रकार नागरिकांच्या लक्ष्यात आला. त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यास माहिती दिली.

याबाबत वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी, नितीन जगताप, दशरथ मोरे, सतीश बैरागी, प्रकाश उंबरकर, प्रकाश चव्हाण करत आहेत.