नाशकात विवाहितेची आत्महत्या

नाशकात विवाहितेची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घराच्या टेरेसवरुन उडी मारत २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना सिडकाेतील (Cidco) खुटवडनगरात (Khutwadnagar) रविवारी (दि. २) सकाळी घडली आहे...

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रियंका आकाश पगारे (Priyanka Pagare) (रा. कृष्णा अपार्टमेंट, माहेरघर मंगल कार्यालयसमोर, खुटवडनगर) असे विवाहितेचे नाव आहे.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास बिल्डिंगच्या गच्चीवरून उडी मारत तिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून तिच्याकडे पाेलिसांना सुसाईड नोट (Suicide note) सापडली आहे.

तिला उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टर धूम यांनी तपासून मृत घोषित केले आहे. सुसाईड नाेटमध्ये तिने स्वखुशीने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. पुढील तपास अंबड पोलीस (Ambad Police) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com