विधवा 'कल्याणी'च्या आयुष्यात आली 'प्रफुल्ल'ता

विधवा 'कल्याणी'च्या आयुष्यात आली 'प्रफुल्ल'ता

नाशिक | Nashik

लग्नाच्या रुढी परंपरेचे बंधन तोडून एका विधवेशी लग्नाचे (Marriage to Widow) अनोखे बंधन बांधण्याची क्रांतिकारक घटना घडली आहे. हा विवाह समाजाला एक नवी दिशा देणारा असल्याचे म्हणत तरुणाचे व तरुणीचे कुटुंबीयांकडून कौतुक करण्यात येत आहे...

अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरेला फाटा देत विज्ञाननिष्ठ संकल्पनेवर आधारित प्रफुल्ल वाघ व कल्याणी यांचा शिवविवाह नुकताच सत्यशोधक पद्धतीने पंचवटीतील (Panchavti) मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. विधवेशी विवाह करत तिला समाजात पुन्हा सन्मानाने जगण्याची उमेद देणाऱ्या वाघ यांच्यावर समाजातील सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विवाह सोहळ्यातून अंधश्रद्धेला फाटाप्रसिद्ध मसाला व्यावसायिक रेखा व एकनाथ वाघ यांचा मुलगा प्रफुल्ल व कल्याणी यांच्या विवाहापूर्वी दोन्ही कुटुंबांतील ज्येष्ठ सदस्यांना पारंपरिक व शिवविवाहातील फरक समजावून सांगितल्यावर त्यांनी विवाहास होकार दिला.

सुरवातीला महात्मा फुले, राजमाता जिजाऊ, शिवराय, सावित्रीबाई आदी महापुरुषांच्या प्रतिमांसह संविधान, शिवधर्म गाथा आदी ग्रंथांचे पूजन झाले. सई वाकचौरे यांच्या जिजाऊ वंदनेने विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी क्रांतिकारी विचार समाजापुढे आणताना प्रथम ते स्वतःच्या कृतीद्वारे समाजापुढे आणणे आवश्‍यक असल्याचे सांगितले.

मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी दोन्ही कुटुंबांतील सदस्यांचा सन्मान केला. ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्नील इंगळे यांनी अशा विवाह सोहळ्यातून अंधश्रद्धेला फाटा दिला जात असल्याचे सांगितले.

मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे पारंपरिक व शिवविवाहातील फरक समजावून सांगितला. याशिवाय प्रथम नवरदेव वधूचे पूजन करून तिला प्रथम वरमाला घालत असल्याचे सांगितले. महिलांना मानसन्मान देणारी शिवविवाह संकल्पना समाजात रुजणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com