Video : मंगल कार्यालय बनले कांद्याची चाळ

Video : मंगल कार्यालय बनले कांद्याची चाळ

लॉन्समध्ये उन्हाळ कांद्याची साठवणूक

येवला | Yeola

कोरोनाच्या महामारीत अनेक व्यवसाय डबघाईला गेले तर अनेक व्यवसाय उध्वस्त होत असयाचे चित्र आहे. कोटी रूपयांची गुंतवणुक करून उभारलेली मंगल कार्यालये,  लॉन्स यांचा करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे वांधा झाला आहे.

सनई चौघड्यांच्या वाद्यात हळदी समारंभापासून ते शुभमंगल सावधान होवो पर्यंत जी मंगल कार्यालये आप्तेष्ट, गणगोत्र, वऱ्हाडी मंडळीनी गजबलेले असायची आज त्याच मंगल कार्यालयांमध्ये कांदा वऱ्हाडी बनवून विसावला आहे. येवला तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मंगल कार्यालयात लॉन्सचे मालक उन्हाळ कांद्याची साठवणुक करतांना दिसुन येत आहे.

कांदा हा तसा संवेदनशील विषय ! योग्य बाजार भाव मिळावा म्हणुन महाराष्ट्रात सर्वाधिक आंदोलन कांदा उत्पादकांनीच केले असतील. कधी कांद्याने रडवेल तर कधी हसवले सुध्दा, कधी पाणी शेतकऱ्याच्या डोळ्यात तर कधी ग्राहकांच्या ....

तर कधी कधी कांद्याने सत्तास्थाने देखील हलवली अशा या कथा आकलेच्या कांद्याने वधू - वरांच्या सिंहासनापर्यंत मजल मारली तर त्यात नवल काय !

एका लग्न तिथीसाठी पंन्नास ते पंच्याहत्तर हजार रूपये देवून लॉन्स बुक केला जायचा, त्याच महागडया जागेत कांदा दिमाखात विराजमान झाला आहे. तोही चार - पाच महिन्यांसाठी. नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांद्याचा हंगाम सुरू आहे. मार्च अखेर मुळे काही दिवस बाजार समित्यां बंद तर नंतर झालेल्या लॉक डाऊनमुळे कांद्याचे भाव कोसळले.

यंदाचा हंगामात कांद्याचा ऐकरी उत्पादन खर्च साठ हजारांवर जावून पोहचला. रोगट हवामानामुळे व बियाणे टंचाईमुळे कांद्याच्या उशीरा लागवडी झाल्याने उत्पादन घटले. प्रति ऐकरी जेथे १५० ते १७५ क्विंटल कांदा उत्पादन व्हायचा तेथे आज ७० ते १०० क्विंटलचे उत्पादन हाती येत आहे.

अपेक्षित बाजार भाव नसल्याने कांदा साठवून ठेवण्यावर शेतकरी भर देत आहे. लॉक डाऊनमुळे ओस पडलेल्या लॉन्सच्या जागेचा सदोपयोग म्हणून लॉन्सचे मालक लॉन्सच्या प्रशस्त जागेत कांदा साठवत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com