विवाह जमविणे झाले अवघड

विवाह जमविणे झाले अवघड

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shirvade Vani

विवाह सोहळ्यांचा (wedding ceremonie) कालावधी उत्तरार्धाकडे येत असताना स्थळांचा शोध घेण्यासाठी वधूपिता वर संशोधन करताना अपेक्षांचा डोंगर कावडीप्रमाणे खांद्यावर घेऊन थांबायला तयार नसल्यामुळे ‘हुंडा देतो पण मुलगी नको’ असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

विवाह सोहळे पार पाडण्यासाठी आता 12 महिने प्रत्येक महिन्यात विवाह मुहूर्त निघत असले तरी हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार तुलसीविवाह (Tulsi Vivah) पार पाडल्यानंतरच खर्‍या अर्थाने वधू-वरांच्या चिकित्सा करण्यासाठी प्रारंभ होत असतो. काही वर्षांपासून एखादा नवरा मुलगा आहे का असे विचारण्याची पद्धत आता बदलून गेली असून एखादी नवरी मुलगी आहे का असे प्रत्येक जण विचारतांना दिसत आहे. दिवसेंदिवस वधू-वरांचा शोध घेण्यामागे वधूपिता यांची वेगळीच मानसिकता निर्माण झाली असून वर पित्यासाठी वधू संशोधन करणे म्हणजे फक्त मुलगी पसंत करणे एवढाच मुद्दा उरलेला असला तरी वर संशोधन करतांना प्रारंभी मुलगा चांगल्या नोकरीवरच (job) असणे आवश्यक असून ज्या वधूपिताकडे मुबलक जमीन (land) असताना अपेक्षा करणे उचित ठरेल.

परंतु काही वधूपिता आकडे एक गुंठा ही जमीन नसताना वर पित्याकडे मुलाच्या वाट्याला किमान तीन एकरच्या पुढे जमीन पाहिजे अशी अपेक्षा धरली जाते. आता ऑनलाइन जमिनीचे उतारे (Online land excerpts) निघत असल्यामुळे किती जमीन येते हे पाहण्याची देखील मजल गेली आहे. शेती तर पाहिजेच परंतु आमची मुलगी शेती करणार नाही. ही सरळ भाषा वापरली जाते त्यावेळी शेती कशाला विकून खायला पाहिजे का असा सवाल वर पक्षाकडील मंडळी करत असतात. पूर्वीच्या काळी वधु मुलगी वराच्या घरी नांदायला जात असताना वधूपिता यांचा पाय खाली असत परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून तुरयावरचा गमती प्रमाणे हे चित्र आता उलटून गेल्याचे दिसून येत आहे.

वर संशोधन करताना वर मुलगा व्यसनी असला तरी चालेल परंतू वराकडे राहण्यासाठी बंगला पाहिजे, परंतु तो शेतामध्ये नको शहरामध्ये हवा असतो, चार चाकी गाडी पाहिजे असा अपेक्षांचा डोंगर समोर ठेवला जातो. या हव्यासापोटी सद्यस्थितीत तरी मुलींचे वय वाढत चालले असून दिवसेंदिवस मुलीचे तारुण्य तसेच सौंदर्य कमी झाल्यामुळे काही मुलींचे विवाह होत नसल्याचे चित्र समोर दिसत असताना देखील वधू पित्यांचा हेका ते सोडायला तयार नाही. त्यामुळे विवाह बंधनात अडकन्यापासून काही मुलींना वंचित रहावे लागत आहे. प्रति वर्षीच्या तुलनेत विवाह सोहळा यांच्या तारखा भरपूर प्रमाणावर असतांना देखील गेल्या दोन वर्षांपासून विवाह सोहळे कमी होताना दिसत आहे.

पाच वर्षाच्या मागील कालखंडाकडे दृष्टीक्षेप टाकला असताना वधू-वरांच्या वयातील अंतर हा किमान पाच ते सहा वर्ष असताना आता वधू-वरांच्या वयामधील अंतर अवघ्या दोन तीन वर्षाचे येत आहे. पूर्वीच्या सोहळ्यांमध्ये मुलीचे लग्न करून देताना वर मुलाला हुंड्याच्या स्वरूपात सोन्याची चेन किंवा अंगठी तसेच मुलीला स्वयंपाकासाठी लागणारे भांडे व सगळा संसार वधूपित्याकडून नातेवाईकांच्या मदतीने घेऊन दिला जात असे. परंतु सद्यस्थितीत त्यांची मानसिकता बदलून गेल्यामुळे वर पित्यालाच कधीकधी या सर्व गोष्टींचा खर्च करतांना दमछाक होत आहे.

सद्यस्थितीत मुलीकडील मंडळी वर संशोधन करताना निर्व्यसनी मुलगा, सुसंस्कृत घराणे, मुलांची वर्तणूक, ध्येयवादी, जबाबदार व्यक्तीमत्व व कर्तबगारपणा या गोष्टी पाहण्यापलिकडे वेगळ्याच दिशेने वाटचाल करू पहात असल्यामुळे कालांतराने त्या गोष्टीचा पस्तावा भोगण्याची वेळ येते व ‘चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे’ असतातच हा निसर्गाचा नियम आहे. परंतु या गोष्टीची जाणीव तेव्हाच होत असते. परिणामी वेळ हातातून गेलेली असते त्यामुळे झाकली मुठ सव्वा लाखाची या म्हणीप्रमाणे गत होत असते.

परिस्थितीमध्ये सुधारणा कालांतराने होत असते. परंतु एकदा हातातून गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही या बाबींचा अभ्यास करणे सर्वांच्याच दृष्टिकोनातून अतिशय गरजेचे आहे. यावर्षी विवाह सोहळ्यांचे प्रमाण बहुतांशी कमीच राहिले असून मे महिन्यामध्ये अवघ्या सहा तारखा शिल्लक असताना देखील स्थळांचा शोध घेता घेता या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष न देता पाठ फिरवली जात आहे. त्यामुळे ‘हुंडा देतो पण मुलगी नको’ असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com