आकाश कंदिलांनी बाजारपेठ सजली

खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह
आकाश कंदिलांनी बाजारपेठ सजली

नाशिक | मोहन कानकाटे | Nashik

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali) येऊन ठेपल्याने शहरात दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची (Customers) झुंबड उडाल्याचे दिसत आहे...

शहरातील बाजारपेठा रंगबिरंगी आकाश कंदीलने (Akash Kandil) उजळून निघाल्या आहेत. तसेच दिवाळीत घरासमोर आकाशकंदील लावण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली असून आधुनिक (Modern) (ऑनलाइन) काळातही आकाशकंदीलचे महत्त्व आजही कायम आहे.

करोनामुळे (Corona) दोन वर्षांपासून दिवाळीचा सण साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. परंतु करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बाजारपेठेत नवीन उत्साह दिसत आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे आकाशकंदील दाखल झाले असून हे कंदील साड्यांपासून बनविले जातात.

यामध्ये पैठणी, म्हैसूर सिल्क, टंचोई सिल्क, बंगळुरू सिल्क, इरकली, पॉलिकॉट आदी साड्यांचा समावेश आहे. एका साडीत (Saree) चार ते पाच कंदील तयार होतात. त्यानंतर साडीच्या किंमतीनुसार या आकाश कंदिलांच्या किंमती ठरवल्या जातात.

त्याचबरोबर विविध प्रकारचे कंदील बनविण्यासाठी वेगवेगळे साहित्य वापरले जाते. यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक कंदीलसाठी बांबूच्या कांबट्या, जिलेटिन प्लास्टिक कागद, साधा प्लॅस्टिक कागद व चमकी यांचा वापर होत असतो.

तर इको फ्रेंडली आकाशकंदील तयार करण्यासाठी कागदी पुट्टा, लाकूड, बारदान, वेलवेट, फर कापड, लोकर, ट्रेसिंग पेपर, तार यांचा वापर केला जातो. याशिवाय पुठ्यापासून देखील आकाशकंदील तयार केले असून हे कंदील लाकूड आणि कापडाच्या कागदापासून बनविले जातात.

तसेच बाजारात (Market) तोरण कंदील, करंजी कंदील, हंडी कंदील, झुंबर कंदील, पारंपारिक षटकोनी कंदील, झोपडी कंदील, चौकोनी कंदील असे कंदील उपलब्ध आहेत. यात करंजी कंदीलाची किंमत ४० ते ७०० रुपयांपर्यंत आहे. तर पारंपारिक षटकोनी कंदीलाची किंमत २० ते १३ हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच चौकोनी कंदीलाची किंमत १०० ते १००० पर्यंत आहे.

याशिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कच्या मालाचे (Raw Materials) भाव वाढल्याने आकाश कंदीलांची किंमत १० ते ३० टक्यांपर्यंत वाढली आहे. तरी देखील आकाशकंदील खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे. तसेच होलसेल विक्रेत्यांपेक्षा घाऊक (किरकोळ) विक्रेत्यांकडे आकाशकंदीलची मागणी अधिक वाढली असून ग्राहकांचा पारंपारिक आणि इकोफ्रेंडली आकाशकंदील खरेदीकडे जास्त कल दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे सण उत्सव यांच्यावर निर्बंध असल्याने कंदीलांची मागणी कमी होती. परंतु यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ग्राहकांचा आकाशकंदील खरेदीसाठी प्रतिसाद मिळत आहे. तसेच घरगुती कंदील खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह दिसत आहे.

नम्रता परदेशी (विक्रेता)

दरवर्षी पेक्षा यंदा ग्राहकांची कंदील खरेदीसाठी अधिक गर्दी आहे. तसेच बहुतांशी आकाशकंदील तयार झाले असून नागरिकांचे वेतन आणि बोनस यावर खरेदी- विक्री अवलंबून आहे. तर १०० ते १००० रुपयांच्या आत किमतीचे आकाशकंदील खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल आहे.

प्रशांत कदम (विक्रेता)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com