देवळाली कॅम्प । Deolali Camp (वार्ताहर) :

करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्यात शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकान आणि व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्याचे पडसाद भगूर मध्ये काल उमटले अडून काटेकोर पणे अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले.

प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार आज भगूर शहरातील मुख्य बाजारपेठा बंद असल्याचे दिसून आले भगूर शहरातील व्यापाऱ्यांनी देखील आपली जबाबदारी ओळखून स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नेहमीच गजबजलेलं भगूर बस स्टॉप परिसर, भगूर मेन रोड परिसर, सुभाष रोड, शिवाजी चौक, मंदिरे प्रार्थनास्थळे आणि इतर आस्थापना बंद असल्यान सर्वत्र शांतता व शुकशुकाट पाहायला मिळाले.

अत्यावश्यक सेवेच्या काही औषधे दुकाने वगळता सर्वत्र उत्स्फूर्त कडकडीत बंद पाळण्याचे लक्षात येत आहे. तसे भगूर प्रशासनाच्या वतीने कालच शहरात सर्वत्र लाऊडस्पीकर वरून सूचना देण्यात आल्या होत्या.