Photo Gallery : लॉकडाऊन शिथिल; बाजारात गर्दी वाढली

Photo Gallery : लॉकडाऊन शिथिल; बाजारात गर्दी वाढली

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात आजपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, निर्बंध कायम असतानाही मोठी गर्दी रविवार कारंजा, मेनरोड, अशोकस्तंभ, शालीमार तसेच शहरातील इतर भागात दिसून आली. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी निर्बंध कायम असल्याने गर्दी न करण्याचे आवाहन केल्यानंतरदेखील आज गर्दी उसळून आल्याने पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे...

नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्या कडक लॉकडाऊन काळात कमी झाली. यामुळे दहा दिवसांच्या कालावधीनंतर नाशिकमधील बाजारसमित्या, उद्योगधंदे पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, लॉकडाऊन शिथिल केला म्हणजे आता आपल्याला मनसोक्त फिरण्यास परवानगी अशा भावनेने नागरिक आज रस्त्यावर दिसून आले. पोलिसांनी या नागरिकांवर कारवाई करण्याची गरज आहे. आज जर कारवाई केली नाही तर पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात लाटेला सामोरे जाण्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com